Maharashtra

सोशल मीडीया वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने गुन्हा दाखल, दोन ताब्यात.

सोशल मीडीया वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने गुन्हा दाखल, दोन ताब्यात.

प्रतिनिधी- फहीम शेख.

काल शुक्रवार रोजी शहर पोलिस ठाण्यात सोशल मीडीया वर कोरोनाला आधार धरुन एका विशिष्ट समाजा विरुद्ध तसेच मर्कज निजामुद्दिन विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चार व्यक्तीं नावे 1) मिलिंद सोनवणे चोलामांडलम मेनेजर रा. जगतापवाडी 2) भावेश, महादेव जनरल स्टोर, नगर पालिका जवळ 3) योगेश चंद्रकांत माळी रा. माळीवाडा 4) पंकज ईश्वर सोनार रा. सोनार गल्ली प्रकाशा. विरुद्ध गु. र. नं. 229/20. भा. दं. वि. कलम 153(अ),188,290,505(2) सह राष्ट्रीय आपत्ती व्यस्थापन कायदा 2005 चे कलम 45 सह. साथीचे रोग प्रतिबांधक कायदा 1897 चे कलम 3 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(फ) अश्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असुन चंद्रकांत माळी व पंकज सोनार यांना ताब्यात घेतली असुन वरील दोन साठी पोलिस पथक कार्यवाही करीत आहे.
कोरोनाला आधार धरुन एका विशिष्ट समाजा व तबलीगी जमात विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करून एका विशिष्ट समाजाविषयी इतरांची भावना भड्केल असे पोस्ट सातत्याने टाकत होते.

ए.आई.एम.आई.एम पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिला होता व अश्या प्रव्रुत्तीच्या समाज विघातक लोकांवर त्वरीत कडक कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
पोलिस निरीक्षक नंदवालकर यांनी सांगितले की सायबर सेल च्या माध्यमाने कडक नजर ठेवण्यात येत असुन जो कोणी अशी क्रूत्य करत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे त्यांच्यावर अश्याच प्रकारे त्वरीत कार्यवाही करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button