मेंढपालासाठी स्वतंत्र कायदा करुन त्यानां न्याय मिळवून द्यावा कोल्हापुर महाराष्ट्र यशवंत सेनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
मोठा वाघोदा मुबारक तडवी
महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले आंणि अत्याचार थांबावे अणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी , तसेच शासनाने मेंढपाळ बांधवासाठी स्वतंत्र कायदा करुन त्याना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र यशवंत सेना कोल्हापुर जिल्ह्याच्या वतीने ६ रोजी सकाळी 12 वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय, मा. प्रांताधिकारी, तसेच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार याना निवेदन देऊन मागणी केली.
तसेच या सर्व निवेदनाची शासनाने तसेच या महाराष्ट्राचे सवेदनशील मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यानी घ्यावी अन्यथा हा समाज हातातल्या काठीच्या ठिकाणी कुराड कोयता घेतल्याशिवाय रहाणार नाही असे कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्ष मा. संदीप चौगुले यानी बोलताना सांगितले. यावेळी उदोगपती मा. सुनिल ( भाऊ ) खोत , कोल्हापुर जिल्हा कार्याध्यक्ष मा. बंडु दादा आरगे , जिल्हा संघटक मा. दत्ता ठोंबरे , जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मा. अमोल गावडे ( पत्रकार ) , जिल्हा सरचिटणीस मा. अमोल ढोणे , जिल्हा सहप्रसीद्धी प्रमुख मा. राहुल जंगटे , शिरोळ तालुका उपाध्यक्ष मा. साईनाथ व्हनभीसे , हातकलंगले तालुका प्रसिद्धी प्रमुख मा. राम ठोंबरे , आरुष दत्ता ठोंबरे, इ समाजबांधव उपस्थीत होते .






