प्रतिनिधी नुरखान
गो पूजन करून वाढदिवस साजरा
शिरिषदादा चौधरींनी टाळला समारंभ
दरवर्षी कार्यकर्ते, कुटुंबिय व मित्र मोठा समारंभ आयोजित करून वाढदिवस साजरा करतात परंतु कोरोनाची महामारी आली असताना सामाजिक अंतर ठेवावे, तसेच एकीकडे आपले बांधव मृत्यू शय्येवर असताना वाढदिवस साजरा करणे मानवतेला शोभणारे नाही म्हणून माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी गो शाळेला 51 हजार रुपये दान देऊन वाढदिवस समारंभ टाळला.
नवा आदर्श घालून देणारे शिरिषदादा यांचे या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कोरोनाशी संघर्ष करताना माणसे माणसाला सावरत आहेत त्यांना आपण देखील सर्वतोपरी सहकार्य करून लोकांसोबत आहोत आणि मुक्या जनावराला देखील सांभाळणे गरजेचे आहे, गोमाते चे जतन केले पाहिजे म्हणून आपण गोशाळेस दान करून आशिर्वाद घेतला असे शिरिषदादा विनम्रपणे म्हणाले.
दादा, आपणास वाढदिवस अभिष्टचिंतन व भावी वाटचालीस सदिच्छा. .






