लालपरीच्या “लाल” चा आपल्या हक्कांसाठी बेमुदत संप सुरू..
अमळनेर- राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात अमळनेर आगारातील कर्मचारी देखील रविवारी रात्री पासून बेमुदत संपावर गेले आहे.
सणासुदीच्या काळात सर्व सामान्यांची लालपरिचा चक्का जाम झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनांनी दर वाढविले आहेत रविवारी दुपारी काही प्रमाणात बस फेऱ्या सुरु होत्या, मात्र सोमवारी संपूर्ण फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
याबाबत कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुख यांना निवेदन देत हि माहिती दिली. दुपारी
अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या,तर दि.८ रोजी सोमवारी सकाळपासून पूर्णपणे बस फेऱ्या रद्द राहणार असल्याचे कर्मचारी संघटनानी जाहीर केले आहे. रात्री पूणे मुंबई
जाणाऱ्या धूळे रोड वरिल खाजगी लक्झरी स्थानकाववर प्रवाशांच्या गर्दी मूळे यात्रेचे स्वरूप आले होते.
दरम्यान सणाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून भाऊबीजेला माहेरी गेलेल्या महिलांचा माहेरी मुक्काम वाढला आहे.






