?Big Breaking…. वाझें बरोबर ट्रायडंट हॉटेल मध्ये असणारी ती महिला कोण..?
मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत. त्यानुसार ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझे यांच्यासोबत एक महिला दिसून आली होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते. त्यामुळे ही महिला कोण, याचा तपास सध्या NIA करत आहे.
त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन वाझे यांनी बोगस आधारकार्ड दाखवून ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रवेश मिळवला होता. यावेळी त्यांच्याकडे ५ बॅगा होत्या. यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचा NIAला संशय आहे. तसेच त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे यंत्र होते. त्यामुळे ही महिलाही या कटात सहभागी होती का, याचा शोध NIA घेत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी सचिन वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील खोलीची झडती घेतली होती. याठिकाणी NIA च्या अधिकाऱ्यांचे जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर NIA अधिकारी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन परतले होते.
सध्या NIA सचिन वाझे यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून प्रश्न विचारत आहे. ५ पैकी कोणत्या बॅगेत जिलेटीन होते, सोबतची महिला कोण होती, याबाबत सचिन वाझे यांना प्रश्न विचारले जात असल्याचे समजते.






