माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांनी केली शिवभोजनालयाला मदत
अमळनेर
आज संपुर्ण भारत देश कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतांना स्वतःला जनसेवेत झोकुन देणा-या नागरी सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना सलाम करुन महाराष्ट्र शासनाच्या गरीब व गरजुंसाठी शिवभोजनालयाच्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून दररोज शासनाच्या इष्टांकानुसार श्रीनाथ खानावळ चालकास ७५ थाळी मंजुर असुन शिवभोजनालयात येणा-या लाभार्थ्यास मुल्यदर ५ रुपये ठेवण्यात आले असुन शासन प्रतिथाळी ४५ रुपये अनुदान देणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाभार्थी संख्या कमी असल्याने प्रतीदिन २५ लाभार्थी ४५ रुपये प्रमाणे दहा दिवसांसाठी रु. ११२५०/- ची आर्थिक मदत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे …दोन्ही खानावळीत शासन ४५ रूपये अनुदान देईल तेव्हा देईल पण माजी आमदार पाटील यांनी स्वतः च्या खिशातून 22500/- रुपये अनुदान दिले आहे
वयाच्या 70 व्या वर्षी आपला वाढदिवस साजरा न करता अनेक गरजूंना जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून देत आहेत.






