वरिष्ठ उत्पादन शुल्क अधिकारी अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी अकोले पॅटर्न कधी राबवतील?
“राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप व जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी अकोला तालुक्यात ६ महिन्यात छापेमारी करून ४१ गुन्हे ४५ आरोपी सह लाखोंची देशी विदेशी दारू व बियर हस्तगत केली.व या कायद्याला न जुमानणाऱ्या व अनेक गुन्हे दाखल असलेल्या अवैध दारू विक्रेते व त्यांना जामीन देणाऱ्यांच्या प्रतेकांच्या मिळकतीवर थेट त्यांनी शासनाचा १ लाखाचा बोजा चढविला तर अनेकांना हद्दपार करण्याची कठोर कारवाई सुद्धा करुन गुन्हेगारी संपेल असे राज्यातील पहिले उदाहरण दिले.तरी या धर्तीवर जळगांव व भुसावळ येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी थेट छापेमारीच्या कारवाया करून प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे कायदाराबवावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- अजीबात अवैधरीत्या दारू विक्री कोणीच करू नये,किंवा होता कामा नये यासाठी शासनाने उत्पादन शुल्क विभागा ही विशेष यंत्रणा निर्माण करून अधिकाऱ्यांची नियुक्ती सह त्यांना कारवाई करण्याचे स्वतंत्ररीत्या अधिकार सुद्धा सरकारने दिलेले असून सोबत पोलीस यंत्रणा देखील आहे.यात गुन्हेगारी संपवण्यासाठी कायदा राबवणारे प्रमाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.हे मात्र खरे
मात्र जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा व परिसरात सदर यंत्रणा असुन नसल्या सारखी दिसून येते.किंवा सदरील प्रकार या क्षेत्रात चालत नसल्याचे चित्र दाखवण्यात येते असले.तरी कोणतीच परवानगी नसताना तसेच अवैधरित्या देशी दारू सह हात भट्टीची दारू प्लास्टीक पिशव्यात राजेरोसपणे जोमाने विक्री केली जात आहे.तसेच शासकीय आदेशानुसार वर्ष भरात ज्या ज्या विशेष दिवशी दारू विक्रीवर बंदी घालण्यात येते.परवानाधारक देशी-विदेशी दारूच्या दुकाने,वाईन शॉप वगैरे बंद ठेवण्यात येते.अशा प्रतेक विशेष दिवशी काही हाँटेलसमध्ये व इतर ठिकाणी देशी-विदेशी दारु बियर मोठ्या प्रमाणात जास्त भावाने विक्री केली जाते.तसेच मोठ्या प्रमाणात विविध नावाची विदेशी दारू व बियरच्या बाटल्या ग्राहक खरीदी करून बाहेर घेवून जातात व हा सर्व प्रकार सावद्यात सोसायटी वाईन बार येथे दररोज उघडपणे सुरू असते.यामुळे हे कळत नाही की ते विदेशी दारू विक्री शाप आहे की एक बार आहे.यासोबत वेळेची मर्यादा ओलांडत मनमानी पद्धतीने दारू विक्री येथील सरकारी देशी दारूची दुकाने उघडी ठेवून केली जाते.यावल तालुक्यातून अवैधरित्या रावेर तालुक्यात देखील वाहनाद्वारे दारु पुरवली जात असल्या बाबतची चर्चा सुध्दा ऐैकायला मिळते.तरी या बाबतीत संबंधित उत्पन्न शुल्क विभाग अनभिज्ञ तर नाही ना?की याकडे सोयस्कर रित्या दुर्लक्ष केले जाते?जुन २०२२ मध्ये पुणे येथे राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त उमाप यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची बोलवलेली विशेष बैठकीत जळगांव,भुसावळ उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी न होते का?असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असून सदर प्रकारे होत असलेली अवैध दारू विक्रीची चर्चा चर्चिले जात आहे.






