Amalner

भाजपाचा अमळनेर येथे  शक्ती केंद्रप्रमुख व बूथ कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

भाजपाचा अमळनेर येथे शक्ती केंद्रप्रमुख व बूथ कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

अमळनेर ;-

येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा चा बूथ आणि कार्यकर्ता मेळावा डॉ.संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. महायुतीचे उमेदवार शिरीष चौधरींनी आपल्या भाषणात भाजपाच्या शिस्तीतच काम करून कार्यकर्त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली.
बैठकित कार्यकर्त्याना संबोधित केले. आ.चौधरीची उमेदवारी हा आता त्यांचा वैयक्तिक विषय नसून ती भाजपा आणि कार्यकर्त्याची जबाबदारी आहे,यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडून आणा असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सदर बैठकीत महायुतीचे उमेदवार शिरीष चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रा सुनील नेवे, वार रूमचे आमित वाढे, जिल्हा चिटणीस महेश उत्तमराव पाटील विस्तारक गुलाब पाटील, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्रा डॉ रवींद्र चौधरी, शहर सरचिटणीस दिलीप ठाकूर, सुरेखा पवार, बजरंग अग्रवाल,झुलाल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष हरचंद लांडगे, युवा मोर्चा योगीराज चव्हाण, सरचिटणीस उमेश वाल्हे, हिरालाल पाटील, जिजाब पाटील, दिलीप ठाकूर, विधानसभा क्षेत्र प्रमुख महेंद्र बोरसे, माजी सभापती डॉ दीपक पाटील,समाधान धनगर, माजी तालुका अध्यक्ष भरतसिंग पाटील, मिलिंद पाटील, माजी जि प सदस्य व्ही आर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, अजय केले,शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे, जिल्हा सरचिटणीस पोपट भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन भरतसिंग पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button