मौजे गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात संविधान गौरव दिन साजरा
बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव ग्रामपंचायतीमध्ये दि.26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी ठीक 10 वाजता भारतीय संविधानाचा 70वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये शहिद झालेल्या शुरविर पोलीस जवानाना श्रध्दांजली वाहीण्यात आली यावेळी सरपंच सौ.साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे सामाजिक कार्यकर्ते माधवराव घाटे बाबाराव तोटलवार मारोती घाटे मारोती पाटील माणिकराव बासरे शेख महमद गंगाधर गायकवाड उत्तम घाटे नागोराव घाटे आदीची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.सेवक परिश्रम घेतले.
