Maharashtra

अंभीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक यांना मारहान परंडा तालूक्यातील अनाळा येथिल घटणा

अंभीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक यांना मारहान परंडा तालूक्यातील अनाळा येथिल घटणा

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.९

कर्तव्य बजावत असताना अंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांना आनाळा येथील दुकानदाराकडून मारहाण झाल्याची घटना दिनांक ९ जुलै रोजी सकाळी घडली असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

याबाबत अंभी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे हे दिनांक ९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोरणा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी पोलिस पोलिस कर्मचाऱ्यांसह आनाळा येथे गेले होते आनाळा येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची व दुकानासमोर नागरिकांची गर्दी असल्याने पालवे यांनी रस्त्यावरील वाहने काढण्यास सांगितले व दुकानासमोरील रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले प्लास्टिक कापड काढण्यात सांगितले असता दुकानदार गादिया यांनी हे तुमची नेहमीच असते असे सांगत पालवे यांना धक्का दिला यामुळे प्लास्टिक कापडला पाय अडकून पालवे खाली पडले.
यानंतर पालवे यांनी सदर आरोपी ला घेऊन जाण्यासाठी पोलिस गाडी गाडीत बसलेले असता दोघां जनांनी पोलिस गाडी अडऊन पालवे यांना मारहान केली .
या प्रकरणी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button