Amalner

भाविकांचे श्रद्धास्थान मंगळग्रह मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी मंगळग्रह जन्मोत्सव साजरा

भाविकांचे श्रद्धास्थान मंगळग्रह मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी मंगळग्रह जन्मोत्सव साजरा

अमळनेर :रजनीकांत पाटील

येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवनिमित्त २८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे ५ वाजेला मंगळग्रह सेवा जळगाव येथील ख्यातनाम धावपटू सी.ए.डॉ. रविंद्र खैरनार यांनी त्यांची पत्नी सौ. अल्का व मुलगा कैवल्य यांच्यासह श्री मंगळ ग्रहाच्या मूर्तीवर विशेषपंचामृत अभिषेक केला. त्यानंतरअत्यंत सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूप बाल श्री मंगळाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावले जातात. हा मान मिळालेले योगेश पांडव यांनी वाजत गाजत नवे ध्वज मंदिरात आणले. संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलिप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव,सौ.जयश्री साबे,सौ.सुनीता कुलकर्णी यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. ध्वजपूजनानंतर तो कळसावर वमुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला. दरम्यान धावपटू म्हणून श्री. खैरनार यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंगळ ग्रह सेवा संस्थेने त्यांना गौरविले.कोरोना मुळे मोजक्याच भाविकांची उपस्थिती होती.केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते.त्यांना प्रसाद भंडारी,तुषार दीक्षित व देवेंद्र वैद्य यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button