चोपडा :– माचले ता चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथे आज दि 15 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक पासिंग असलेल्या चार चाकी गाडी गावात आल्यानंतर गाडीतील तीन जणांनी अतुल विजय पाटील या नावाचा व्यक्ती कोण आहे अशी विचारपूस केली असता गावातील डोंगर नवल पाटील या माणसाने या नावाचा व्यक्ती कोणीच नाही असे सांगितले मात्र त्यावेळी त्या गाडीतील तीन तरुणांपैकी एकाने विद्यमान उपसरपंच संतोष पाटील यांच्या घराचा फोटो डोंगर पाटील यांना मोबाईल मध्ये दाखवला त्यावरून त्यांनी घर पाहिल्यावर सांगितले की आम्ही नंतर संध्याकाळी येऊ असे सांगून निघून गेले होते,त्यावर सम्बधित चारचाकी गाडी क्र एम एच १५-एफ एफ-२३३८ ही गाडी पून्हा आली हे लक्षात आल्यावर त्यांनी गावकरी एकत्र आहेत हे पाहिल्यावर त्या गाडी मधील अध्यात आरोपींनी गाडी वेगाने करून पुढे घुमावल गावाकडे घेऊन गेले यावेळी गावकरी घाबरून त्यांनी घुमावल खुर्द येथील गावकऱ्यांना फोन करून दिला होता.घुमावल खुर्द गावकऱ्यांनी ति गाडी येणार म्हणून रस्त्यात लाकडं टाकली होती म्हनुन ती परत पुढे रस्ता माहिती नसल्याने माचाले गावाकडे परत आले.यावेळी माचले गावकऱ्यांनी तीन बैलगाडी रस्त्यात आडवी लावल्या होत्या मात्र अश्या ही परिस्थितीत बैलगाड्यांना ठोकून त्यांनी गावातून पळ काढला .यावेळी त्या चारचाकी गाडीत हत्यारे असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
बैलगाडया आडव्या लावल्या असताना गावकऱ्यांनी दगडफेक केली म्हणून गाडीचे मोठे नुकसान झाले मात्र तरी देखील गाडी न थांबावंता ते चोपड्याकडे पळून गेल्याची माहिती दिली.
या दगडफेकीत बाजार समितीचे सभापती जगन्नाथ दामू पाटील यांना दगड लागल्याने डावा डोळ्याला मोठी दुखापत होऊन चार टाके टाकावी लागले असून ते मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत माझी आमदार जगदीश वळवी यांनी जगन्नाथ दामू पाटील यांची हॉस्पिटल मध्ये भेट घेतली व घडलेल्या घटनेची माहिती घेत परिवाराशी चर्चा केली
*सदर गाडी चा नंबर वरून तपशील काढला असता ती गाडी नाशिक पासिंग असून रतन कडू या नावाने दिसत आहे.याबाबत अडावद पोलीस स्टेशन चे प्रभारी एपीआय मनोज पवार यांनी गाडीचा शोधासाठी नाकाबंदी केली असल्याचे सांगितले







