Bollywood

Bollywood: पतीला शेवटचं पाहून घ्या..जया बच्चन यांना डॉक्टरांनी सांगितले..!

Bollywood: पतीला शेवटचं पाहून घ्या..जया बच्चन यांना डॉक्टरांनी सांगितले..!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिनेते अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची आहे. बॉलिवूडमधील अनेक जोडीपी यांच्या प्रेमाला आणि जोडीला आदर्श मानतात. या दोघांची जोडी इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे कि ७०च्या दशकापासून यांच्या जोडीची चर्चा रंगत आली आहे.
या दोघांच्यात प्रचंड प्रेम आहे. जरी दोघापैके एकाला काय झालं तर दुसऱ्याच्या मनात लगेचच कालवाकालव होते.
अमिताभ बच्चन यांची ही घटना खूप जुनी असली तरी आज देखील त्या घटनेचा विचार केला तर अंगांवर काटा येत असतो. ही घटना ३९ वर्षापूर्वीची आहे. १९८२ साली जेव्हा कुली या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होती त्यावेळी अमिताभ यांच्या एक अपघात झाला होता.
त्या दरम्यान त्यांना खूप इजा झाली होती. त्यांच्या वाचण्याची देखील शक्यता नव्हती. कुलीचा सेट बंगळुरूपासून १६ किलोमीटरच्या अंतरावर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अमिताभ बच्चन एक शॉट शूट करत होते. त्यात त्यांना मारा मारी करायची होती. त्यावेळी पुनीत इस्सर त्यांना मुक्का मारणार होते. मात्र पुनीत यांचा तो मुक्का खूप जोरात अमिताभ यांच्या पोटात जाऊन बसला होता. त्यानंतर अमिताभ यांना दुसरीकडे उडी मारायची होती. मात्र त्यांचा टायमिंग चुकला आणि त्यांच्या पोटावर तिथे असलेल्या टेबलचा कोपरा खूप जोरात लागला होता.
अमिताभ यांना तो मार खूप जोरात लागल्यामुळे त्यांना चित्रपटाचे चित्रीकरण सोडून हॉटेलवर जावे लागले. परंतु अराम करून देखील त्यांच्या वेदना काही थांबल्या नाहीत म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होती. मात्र या अपघातामुळे अमिताभ यांना खूप वेदना झाल्या होत्या. तब्बल त्याच्यावर ८ दिवस उपचार चालू होते.
परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणता देखील बद्दल डॉक्टरांना दिसत नव्हता. त्यामुळे त्यांना आयसीयू नेण्यात आले होते. त्यांची इतकी वाईट परिस्थिती झाली होती कि डॉक्टरांनी देखील अश्या सोडल्या होत्या.
त्याचवेळी डॉक्टरांनी जया बच्चन यांना पतीला शेवटचं पाहून घ्या असे देखील सांगितले होते. या अपघाताची माहिती बिग बी यांनी २०१५ मधील त्यांच्या एका ब्लॉगमधून दिली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button