Amalner

?️ अमळनेर कट्टा…जैतपिर येथे  मारवड पोलिसांची सट्टा जुगार अड्ड्यावर धाड…मारवड पो ठाण्यात  गुन्हा दाखल

?️ अमळनेर कट्टा…जैतपिर येथे मारवड पोलिसांची सट्टा जुगार अड्ड्यावर धाड…मारवड पो ठाण्यात गुन्हा दाखल
तालुक्यातील जैतपिर येथे काल पत्ते खेळणाऱ्यावर मारवड पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि राहुल फुला यांना मिळालेल्या माहितीनुसार जैतपिर येथे मारोती मंदिरांच्या बाजूस मोकळ्या पत्री शेडमध्ये पत्ते खेळणे सुरू असल्याने पो. उ. नि. पेठकर, पो.ना. सुनील अगोने, पो. हे. कॉ. बागवान, पो. हे. कॉ. संजय पाटील, पो. ना. सुनील तेली यांनी या ठिकाणी पाहणी केली असता काही व्यक्ती गोलाकार बसून पत्ते खेळताना दिसून आले. यावेळी छापा टाकला असता दोन तीन जण अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. यावेळी संतोष हिरामण कोळी, भुषण चंद्रसिंग पाटील, गणेश दशरथ कोळी, विकी संतोष कोळी, समाधान दयाराम कोळी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून २०३२० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. या आरोपींविरुद्ध मु. जु. अँक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button