बहुजन क्रांती मोर्चा आयोजित कश्मिर ते कन्याकुमारी ‘राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा संपन्न
अमळनेर बहुजन क्रांती मोर्चा आयोजित कश्मिर ते कन्याकुमारी ‘राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा’ दि.७ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे दु.३ वाजता दाखल झाली.छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी प्रमुख वक्ते म्हणून सभेला संबोधित केले. “ईव्हीएम घोटाळ्यातुन सत्ता हस्तगत करण्याचे षडयंत्र सत्ताधारी पक्षाने चालविलेले आहे. ईव्हीएम च्या आधारे निपक्ष व पारदर्शी निवडणूक पार पाडली जाऊ शकत नाही असे सुप्रिम कोर्टाच्या आदेशातून आधीच स्पष्ट झालेले आहे.मशिन खरेदीच्या माहितीतिल तफावतीतुन लाखो ईव्हीएम आयोगाकडे नसून त्या बाहेर असल्याचे आरटीआय कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीतून उघड झालेले आहे.ईव्हीएम मशीनमुळेच मुख्यमंत्री यांनी सरकार पुन्हा सत्तेत येईल तर विरोधी पक्ष म्हणून वंचित आघाडी राहील असे निवडणूकीच्या आधीच जाहीर केले आहे.असा घणाघाती आरोप करीत लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरच निपक्ष निवडणूका झाल्याच पाहिजे असे वामन मेश्राम यांनी इ व्ही एम भांडाफोड या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
सभेचे उदघाटक म्हणून दंत व मुखरोग तज्ञ डॉ.प्रशांत देवरे यांनी इ व्ही एम घोटाळा लोकशाही ला मारक असल्याने उच्चशिक्षित लोकांनी प्रबोधित झाले पाहिजे असे आवाहन केले.
काँग्रेसच्यापक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अड.ललिता पाटील यांनी ‘इव्हीएम चा दुरुपयोग करून लोकशाहीचा खून करण्याचे कारस्थान सत्ताधारी असलेले मारेकरी करीत आहेत असा आरोप केला.
सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी प्रास्ताविकात ‘संवर्धनासाठी ,आत्मनिर्भर, शोषणमुक्त,समताधिष्ठित, बंधुतेवर आधारित समाजनिर्मितीसाठी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या संरक्षणासाठी इ व्ही एम विरोधी जनआंदोलन काळाची गरज आहे असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय पिछडा मोर्चा अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी ओबीसी च्या लोकांसोबत आजही सरकार धोकेबाजी करीत असल्याचे सांगितले.राष्ट्रीय गौरबंजारा मोर्चाचे निलेश चव्हाण, डॉ.परवेज आलम यांनी ‘इव्हीएम द्वारे बहुजन अल्पसंख्याक वर्गाला राजकीय गुलामीत लोटण्याचे काम केले’असल्याचे सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील यांनी ‘करून सेटींग कसे येतात निवडून’ हे गीत सादर करून प्रबोधन केले.किसान मोर्चाचे हिरालाल पाटील ,अरुण देशमुख यांनी प्रबोधन केले.
यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चा चे राज्य प्रभारी प्रा.शिवाजीराव पाटील यांनी सपत्निक आपल्या पेन्शन मधून १० हजाराचा निधी मा.वामन मेश्राम यांना जनआंदोलनासाठी सुपुर्द केला.तर स्थानिक युनिट च्या वतीनेही १० हजाराचा ,पुंडलिक संदानशिव,महेंद्रसिंग यांनी प्रत्येकी एक हजाराचा जनआंदोलन निधी दिला. देशभरात बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने काढण्यात आलेली सदर परिवर्तन यात्रा १८० दिवसांपासून १७ राज्यातील १८० लोकसभा क्षेत्रात व्यापत आहे. महाराष्ट्रात १६ ऑगस्ट पासून सुरू झालेली ‘राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा’ आज अमळनेर येथे आली होती.
याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय मूलनिवासी महिला मोर्चा अध्यक्षा निशा मेश्राम, भन्ते सोमानंद,नगरसेवक नरेंद्र संदानशिव, आर पी आय अध्यक्ष श्याम संदानशिव,यशवंत बैसाणे,रा का अध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेस अध्यक्ष मनोज पाटील, प्रा.अशोक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.जितेश संदानशिव यांनी केले.आभार कमलाकर संदानशिव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय गाडे, राजू मोरे,आतिष बिऱ्हाडे, प्रमोद बिऱ्हाडे, अर्जुन संदानशिव,द. रु.सैंदाने, मिलिंद निकम,बापूराव संदानशिव बहुजन रयत परिषद चे अध्यक्ष संजय मरसाळे,विजय वाडेकर,अजय भामरे, सुन्नी दारुल कझा मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन अध्यक्ष आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिकांसह अमळनेर तालुक्यातील बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







