Akkalkot

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात संचार बंदीबाबत तहसिलदार अंजली मरोड यांचेकडून जनजागृती

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात संचार बंदीबाबत तहसिलदार अंजली मरोड यांचेकडून जनजागृती

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट,प्रतिनिधी :- कोरोना ह्या भयानक विषाणूच्या संसर्गजन्य रोगाबाबत देशात लॉकडाउन सुरु असताना कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड यांनी मौजे मंगरूळ, करजगी, देवीकवठे, सुलेरजवळगे अश्या अनेक ठिकाणी जाऊन कोरोना वायरसच्या अनुषंगाने ग्रामीण भागात माईक लाऊडस्पीकर ने जनजागृती करण्यात येत आहे.

या माईक च्या माध्यमातून तालुक्यातील संशयित कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन ची व्यवस्था ही करण्यात आल्याचे सांगितले असून, तालुक्यातील या तहसीलदारांच्या दौऱ्याने नागरिक आतिशय शिस्तप्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. या दौऱ्या दरम्यान, त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करु नका तसेच सोशल डिस्टनस्गिंचं पालन करा अशी सूचना केली आहे.
आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका. करोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी गावागावात सरपंच यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. गावातील समिती देखील तहसीलदार यांच्या आदेशानुसार गावपातळीवर आतिशय कार्यतत्परतेने काम करत आहे.

कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर, नर्स करत नाहीत. तर एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ, यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.
अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु आहे. यावेळी ग्रामीण भागात गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही. असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड हे माईक वरून तालुक्यातील तमाम खेड्यात पाड्या, वड्या वस्त्या, सर्वत्र जाऊन आवाहन करत आहेत.

तरी कोरोना ह्या विषाणूजन्य संसर्गाबाबत जनजागृतीच्या वेळी माईक लाऊडस्पीकरने तहसिलदार अंजली मरोड यांनी नागरिकांना संबोधित केले आहे की, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घरी बसून प्रशासनाला सहकार्य करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, स्वतः ची काळजी घ्यावी, तोंडाला रुमाल लावावे, ठिक ठिकाणी चार पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन बसू नये, एकमेकांना स्पर्श करू नये, वारंवार आपले हात स्वच्छ धुवा, पुणे-मुंबई सारख्या शहरांतून आलेल्या नागरिकांनी नोंद करून घ्यावे, आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या, गर्दी होईल अशी रहदारी करू नका, जीव धोक्यात घालू नका, सामाजिक हिताचं काम करा, स्वतः जागरूक राहा निरोगी राहा यासारख्या अनेक प्रकारचे सुचना देत तहसिलदार अक्कलकोट अंजली मरोड यांनी जनजागृती करतेवेळी गावाचे ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील हे देखील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button