Maharashtra

पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिक हवालदिल….नाल्याचे खोलीकरण करताना प्रशासनाचे दुर्लक्ष..

पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिक हवालदिल….नाल्याचे खोलीकरण करताना प्रशासनाचे दुर्लक्ष..नगराध्यक्षा यांची भेट घेण्यासाठी जावे लागले “राजभवन” ला??

अमळनेर

 येथिल कलागुरु ड्रीम सिटीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी रहिवासी यांनी प्रांताधिकारी सिमा अहिरे,तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले.भर उन्हाळ्यात सलग दोन दिवसपासून या विषयासाठी नागरिकांची वणवण सुरू होती.तहसीलदार ज्योती देवरे, नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील ,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल,बांधकाम व्यावसायिक व स्थानिक राहिवास्यांचे समन्वयातून मार्ग निघाल्याने  पाईपलाईन दुरुस्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला.

पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिक हवालदिल....नाल्याचे खोलीकरण करताना प्रशासनाचे दुर्लक्ष..

                   अमळनेर शहरातून जाणाऱ्या पिंपळे नाल्यावर धार-मालपूर बंधाऱ्याच्या पुनर्भरणाचे कामासाठी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण महसूल विभागाने सुरू केले त्यात कलागुरु ड्रीम सिटी व परिसरातील रहिवास्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन अनेक ठिकाणी पाईप फुटले. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक रहिवासी प्रशासनाच्या दारी फिरत होते. फुटलेल्या पाईपलाईन ची दुरुस्तीची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते. अखेर  स्थानिक राहिवस्यानी मा.प.स.उपसभापती श्याम अहिरे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,यांचेसह सूर्यकांत निकम, सी.वाय.पाटील,रविंद्र अहिरे,अरुण नेरकर, वसंत पाटील, गुलाब वाघ यांनी प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी,’नाला खोलीकरण,रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याच्या कामास विरोध नाही मात्र नाल्याचे काम होत असतांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटली ती संबंधितांनी त्वरित दुरुस्त करून द्यावी व परिसरातील पाणीपुरवठा सुरू करावा!’अशी मागणी केली यावेळी  श्रीनिवास मोरे,अविनाश पाटील, बोरसे आप्पा, राजेंद्र शिरसाठ, विक्रम शिंदे, उमेश सोनवणे, पी.आर.पाटील, स्वप्निल पाटील,खुशाल बोरसे,राज जाधव, खंडू पाटील,चुडामन पाटील, निलेश पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकारी यांनी  तहसीलदार व न.प.प्रशासनास याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सांगू असे आश्वासन दिले.मात्र दुसऱ्या दिवशीही नाल्यावरील काम सुरूच होते.त्यात पाईपलाईन दुरुस्ती होत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सकाळीच नगराध्यक्ष्याच्या भेटीसाठी राजभवन वर भेट दिली

पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिक हवालदिल....नाल्याचे खोलीकरण करताना प्रशासनाचे दुर्लक्ष..

 तेथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांचेसह तहसीलदार ज्योती देवरे, कलागुरु ड्रीम सिटी चे बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी धार मालपूर शेतकऱ्यांचे नेते प्रा.गणेश पवार आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत चर्चा करून आपसी समन्वयातून पाईपलाईन दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आणि अखेर रहिवास्यानी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी मोठ्यासंख्येने महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button