Amalner: मांडळ येथे गावठी हातभट्टी वर पोलिसांची धाड..!
अमळनेर मांडळ येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर मारवड पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,एपीआय जयेश खलाने यांनी दिलेल्या
माहितीवरून पोहेकॉ भरत श्रीराम ईशी,पोहेकॉ फिरोज बागवान, कॉ. राजेन्द्र पाटील यांनी मांडळ येथे जात पांझरा नदीकाठी झाडाझुडुपात गावठी दारू हातभट्टी दिसून आल्याने छापा टाकला असता पांडुरंग बुधा भील हा रंगेहाथ आढळून आला.
तेथे 50 लिटर पक्के उकळते रसायन, 120 लिटर कच्चे रसायन, व 15 लिटर तयार दारू इ साहित्य आढळून आले असून साहित्याचे नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.






