कोरोना या विषाणूजन्य आजारापासून बचाव करण्या साठी सरकारच्या वतीने आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावण्याचे आवाहन करणयात येत आहे
प्रतिनिधी मनोज भोसले
तसेच माननीय जिल्ह्याधिकारी साहेबांनी सुद्धा जळगाव जिल्ह्यात मास्क अथवा रुमाल वापरने बंधन कारक केले आहे व मास्क न वापरणाऱ्यास 500 रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे
त्यालाच सकारात्मक प्रतिसाद म्हणून माझे गावासाठी काही देणे लागते या भावनेतून स्वतः माझ्या कडून गावात 1000 मास्क वाटण्यात आले
सदरील मास्क प्राथमिक आरोग्य केंद्र,आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, गावातील किराणा दुकान, जे डी सि सि बँक,गावचे सोसायटी ऑफीस व गावात वाटण्यात आले
या वाटप प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र रांजणगाव मध्ये बँक व्यवस्थापक व कर्मचारी वर्गाला मास्क चे वाटप करतांना निंबाळकर फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री शेखर निंबाळकर,ग्रामविस्तार अधिकारी श्री जयवंत येवले ग्रामपंचायत क्लार्क गणेश देवरे,शिपाई वाल्मिक सोनवणे आदीच्या उपस्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मास्क चे वाटप करून सुरवात करणयात आली
उद्देश एकच आपण सर्वांनी मिळून आपली आपल्या परिवाराची काळजी घेऊया आणि कोरोनाला हरवूया






