Bollywood Abhishek Bachhan: तर ही होती अभिषेक बच्चन ची पहिली पत्नी..!जाणून घ्या रहस्यमय कहाणी..!
बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत ज्यांच्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत एकच खळबळ (माजली होती.
बॉलिवूडतील सर्वात जास्त गाजलेलं प्रकरणं म्हणजे सलमान खान – ऐश्वर्या राय बच्चन – विवेक ऑबेरॉयचं प्रकरणं. या प्रेम प्रकरणाबद्दल आजही हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चा केली जाते. परंतु त्यातून सर्वात गाजलेलं प्रकरण होत ते म्हणजे अभिषेक बच्चनचं…जाणून घेऊ त्याच्या आयुष्यातील काही कॉन्ट्रोव्हर्शियल प्रकरणं.
2007 साली ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं. परंतु त्यानंतर एका वेगळ्याच कारणानं अभिषेक बच्चन चर्चेत आला होता. ते प्रकरण होतं जान्हवी कपूरचं (Janhavi Kapoor). नाही, ही ती जान्हवी कपूर नाही. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर ही ती नाही तर ही एक मॉडेल होती जिनं आपण अभिषेक बच्चन याची पहिली बायको असल्याचा दावा केला होता आणि अभिषेकनं आपल्याला स्विकारलं नाही तर आपला जीवही संपवण्याची धमकी अभिषेकला तिनं त्यावेळी दिली होती.
नक्की काय घडलं होतं ते प्रकरण?
बॉलिवूड हे जितकं ग्लॅमरस आणि आकर्षित करणारं आहे तितकंच ते जास्त गुंतागुंतीचे आणि रहस्यमय आहे. त्यातून बॉलिवूडमध्ये अनेक वादग्रस्त प्रकरणांचाही सिलसिला राहिला आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिषेक बच्चन आणि जान्हवी कपूरचं प्रकरणं. अनेकदा या प्रकरणाबद्दलही चर्चा केली जाते. बच्चन कुटुंबिय आणि वादही काही नवीन नाहीत. अमिताभ बच्चन यांचे अभिनेत्री रेखा यांच्यासोबतचे संबंध आणि श्वेता बच्चनचं अभिनेता ऋतिक रोशनसोबत गाजलेलं प्रेम प्रकरणं.
2007 साली अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. तेव्हा त्यांच्या बंगल्याच्या बाहेर फोटोग्राफर्स हे ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्नाचे फोटो टिपण्यासाठी उत्सुक होते. परंतु त्याच क्षणाला एका मॉडेल-डान्सरनं एकच हल्लाबोल केला. जान्हवी कपूर या मॉडेल डान्सरनं आपण अभिषेक बच्चनची पत्नी असल्याचे सांगितले. 2005 साली आलेल्या दह बहाने या अभिषेकच्या चित्रपटात ती नर्तिका होती.
त्यावेळी जान्हवीनं आपल्यापासून अभिषेकला हिसकावून घेतल्याचे आरोप केले होते. तिनं असा दावा केला होता की काही मित्रांच्या साक्षीनं तिनं 2006 साली लग्न केले होते. तिचं असं म्हणणं होतं की, अभिषेकनं तिच्या कपाळावर कुंकूही लावलं होतं. पण जान्हवी कपूर मात्र त्या साक्षीदारांना समोर आणू शकली नाही. ती म्हणाली होती की, आम्ही एकमेकांशी ई-मेलवरून संपर्क साधायचो. त्याचसोबत आमच्याकडे आमचे फोन नंबरही होते. तिला जेव्हा याबाबतही पुरावा मागितला तेव्हा प्रेमासाठी काही प्रुफ द्यायची गरज नाही.
या प्रकरणात तिनं अभिषेकवर गुन्हाही दाखल केला होता. परंतु त्याचं नंतर काही झालं नाही. गेल्या 14 वर्षांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या आनंदानं एकमेकांसोबत नांदत आहेत. त्यांना आराध्या नावाची मुलगीही आहे.






