? धक्कादायक ब्रेकिंग : देश सुन्न..! लोकप्रिय न्युज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदय विकाराचा झटका..!
नवी दिल्ली : लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसंच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली.
रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते
मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
सुधीर चौधरी हे ट्विटमध्ये म्हणतात, ‘आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय आहे.
सुधीर चौधरी यांचं ट्विट
रोहित सरदाना हे अनेक वर्षांपासून टीव्ही मीडियात कार्यरत होते. ‘आज तक’ वाहिनीवरील दंगल या शोचं ते अँकरिंग करत होते. 2018 मध्ये त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
राजदीप सरदेसाई यांचं ट्विट
मित्रांनो खूपच धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालंय. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन. आरआयपी, असं ट्विट राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.






