Akkalkot

महिलांचा अपमान केल्यास स्त्रियांची आक्रमक शक्ती दाखवा : तृप्ती देसाई

महिलांचा अपमान केल्यास स्त्रियांची आक्रमक शक्ती दाखवा : तृप्ती देसाई

कृष्णा यादव

अककलकोट
आजवर आपण अनेक ठिकाणी भाईगिरी पाहिली आहे पण यापुढे ताई लगिरी पाहणार आहात! समाजातील स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार ,बलात्कार,अपप्रवृत्ती , विनयभंग, हुंडाबळी, आत्महत्या, पतीच्या आणि सासूच्या जाचाला त्रासाला कंटाळून आत्महत्या ,नैराश्य जीवन यामुळे स्त्रियांचे जीवन अंधकारमय झाले आहे .आपल्या भारतीय राज्यघटनेत स्त्रियांना समानतेचा अधिकार असूनही महिलांना विरोध होत असतो ही लाजिरवाणी बाब आहे. महिला सुरक्षिततेविषयी अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर “आ “वासून उभे आहेत त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी कमरेला पदर खोचून निर्भयपणे जगायला हवे असे प्रतिपादन भुमाता ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केले. स्त्री शक्ति महिला मंडळ वागदरी भव्य उद्घाटन कार्यक्रम पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.
प्रथमतः भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांचे सवाद्य वागदरी ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आले.वागदरी विरक्त मठाचे श्री म.नि.प्र.शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्या सानिध्यात कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले हे होते. दीपप्रज्वलन नूतन जि.प.सोलापूर पक्षनेता आनंद तानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्त्री शक्ति महिला मंडळ वागदरीच्या नामफलकाचे उदघाटन भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

व्यासपीठावर प्रशांत देसाई, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी,जि प सभापती महिला व बालकल्याण सोलापूर सौ. स्वातीताई शटगार, अक्कमहादेवी चित्रपट निर्मात्या राजश्री थलंगे, अक्कलकोट निर्भया पथक प्रमुख सोनाली गोडबोले -पाटील, पोलीस मित्र पुणे अध्यक्षा शुभांगी मुंडे- चौधर, रागिणी फाउंडेशन बारामती अध्यक्षा राजश्री आगम, डॉ.उदय म्हेत्रे,सरपंच ललिता ढोपरे, सामाजिक कार्यकर्त्या कलबुर्गी रेखा बिराजदार, ग्रामसेवक रेखा बिराजदार, सरपंच शेकप्पा कलकूटगे, चंद्रकांत इंगळे, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव,चंदनदादा चव्हाण , रतन बंगरगी, विजयकुमार ढोपरे आदी मान्यवर होते.
पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, आज महिला एकत्रित येऊ नयेत म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.महात्मा बसवेश्वरांनी आठशे वर्षांपूर्वी समानतेची शिकवण दिली पण आजही स्वतःच्या अधिकारासाठी स्रियांना लढावे लागते .समाजात महिलांचा सन्मान व्हायला हवा. चांगल्या कीर्तनकारांचा आम्ही अभिमान करतो पण आज काही कीर्तनकार महिलांचा अपमान करीत आहेत. चारित्र्यहानन करीत बदनाम करीत आहेत. स्त्रियांना बदनाम केल्यास स्त्रियांचा दुर्गा आणि कालिका रूप दाखवा.खऱ्या अर्थाने महिला स्वतः निर्भय बना, स्वतः दुर्गा बना, मुलींना समानतेचा धडा घरातून दिला पाहिजे. आपली बाजू सत्य असेल तर त्याला विरोध केला जाईल पण विजय आपलाच होणार हे मात्र तितकेच सत्य आहे.महिलांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जग तुमचा असेल. महिला सबलीकरणाची चळवळ दृढ झाली पाहिजे.महिलांनी प्रत्येक कार्यात कार्यक्षमतेने सहभाग नोंदवून पदर खोचून काम करायला शिका तेव्हाच नारीशक्तीची किंमत जगाला समजेल. यावेळी भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी,जि प सभापती महिला व बालकल्याण सोलापूर सौ. स्वातीताई शटगार, जि प पक्षनेते आनंद तानवडे व अक्कलकोट निर्भया पथक प्रमुख सोनाली गोडबोले -पाटील यांचे ही मनोगते झाली.यावेळी स्त्री शक्ती महिला मंडळ वागदरी अध्यक्षा विमल पोमाजी, सचिवा शैलजा वाडे, उपाध्यक्षा बसमा पोमाजी, सहसचिव लक्ष्मीबाई पोमाजी, खजिनदार शरणमा पोमाजी, महादेवी मठपती ,अंबाबाई मंगाणे, लोचना सुतार ,महानंदा वमने, ललिता भठारे, सविता गोगाव,संगीता कोळी ,सविता शिंदे ,निर्मला गावडे, सुनिता भीमपुरे,कलावती कणसे, सुचेता नंदर्गी, नंदाबाई पवार, रूपाली पोमाजी,योगेश्री निंबाळे,सरोजनी पोमाजी यांच्यासह शालेय विद्यार्थिनी ,माता -पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद गोगाव व नागप्‍पा अष्टगी तर आभार घाळय्या मठपती यांनी मानले.

वागदरी येथे स्त्री शक्ती महिला मंडळ च्या नामफलकाचे उद्घाटन करत असताना भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, आनंद तानवडे ,अध्यक्षा विमला पोमाजी यांच्या सह महिला मंडळ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button