Maharashtra

शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी यांचे अल्पश आजाराने निधन

शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी यांचे अल्पश आजाराने निधन

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

रावेर तालुक्यातील जानोरी गाव येथील रहिवासी व रावेर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नवाज रमजान तडवी यांचे अल्पश आजाराने दि. 28/05/2020 रोजी दुःखद निधन झाले. याची बातमी पसरताच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली व शिक्षण विभागाने एका कर्तव्य दक्ष अधिकाय्रांला मुकल्याचे बोलले जात आहे. तसेच याच महीन्यात काही दिवसा पुर्वी कुंभारखेडा केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र सावखेडकर यांचे अपघात झाल्यानंतर उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झाले.
परिणामी
रावेर तालुक्यातील शिक्षण विभाग या कर्तव्य दक्ष अधिकार्यांना विसरू शकणार नाही व त्यांनी रोवलेली मार्गदर्शनाची रोपे भविष्यात वटवृक्ष प्रमाणे सावली देतांना दिसेल. सामाजिक बांधिलकीची आपल्या कृतीतून छाप उमटविणारे अधिकारी नवाज रमजान तडवी यांनी निधना पुर्वी नुकतेच आदिवासी तडवी बोली भाषेत एक छान व सुंदर लिहिलेली कविता

कोरोना.
बरा होला कोरोना,
तु आला!
त्यामुळं माणसाल माणूस
तरी समजला!
या काळात
माही नोकरदार भाऊंन
लय केली समाजाची सेवा! त्याचा आता दुसरं लोग,
करिल हती हेवा!
अल्लाह पाक माहि समाजाला असाच धर एक अन नेक,
फकत इतली मेहरबानी कर!
या कोरोनाची मुशिबत

पुरी दुनियातून दूर कर
पुरी दुनियातून दूर कर!

अश्या सुंदर ओढी लिहुन अल्लाह दरबारी संपुर्ण जगाला या कोरोना आजारा पासुन मुक्तीची प्रार्थना करून नवाज तडवी यांनी जगाचा निरोप घेतला.

या दुःखद निधना वर
रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डाॅ सोनिया नाकाडे , गशिअ सोनवणे सर , सभापती जितेंद्र पाटील , व संघटनेचे पदाधिकारी दिलीप पाटील, गौस खान, हबीब तडवी, फिरोज तडवी, रविंद्र बखाल, राहुल पाटील, भुषण चौधरी, असलम खान, संजय कोळी , कैलास घोलाने, व सर्व शिक्षक बांधवांनी शोक व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button