Maharashtra

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ढेकू रोड येथील राजर्षी शाहू महाराज चौकाचे सुशोभीकरण

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ढेकू रोड येथील राजर्षी शाहू महाराज चौकाचे सुशोभीकरण 

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ढेकू रोड येथील राजर्षी शाहू महाराज चौकाचे सुशोभीकरण

अमळनेर
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ढेकू रोड येथील राजर्षी शाहू महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले.सामाजिक न्याय दिनाचे औचित्याने राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. 
              लोकराज शाहू महाराज यांच्या जयंती दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष ,नगरसेवक श्याम पाटील यांच्या तर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रभागाचे ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब जयवंतराव पाटील, डॉ.सुमित सूर्यवंशी (श्री हॉस्पिटल), प्रा.विजय पवार सर(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक), किरण माळी सर(IKD Classes) सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे सर, ज्ञानेशवर देसले, योगेश पाटील (तरवाडे), अक्षय चव्हाण आदिंनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी राजर्षि शाहू महाराजांचा विजय असो!,जय जिजाऊ,जय शिवराय!, या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. 
             यावेळी युवा कार्यकर्ते भूषण भदाणे, सारंग लोहार, निनाद शिसोदे, मयूर पाटील, अक्षय पाटील, राज लोहार, उज्ज्वल मोरे, उमेश पाटील, दिशांत पाटील, विपुल पाटील, राहुल पाटील, राजरत्न सोनवणे, आशुतोष निकम आदिसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
[6/26, 2:38 PM] Ranjit shinde: राजर्षी शाहू महाराज चौकात प्रतिमपूजन करतांना डॉ.सुमित सूर्यवंशी,नगरसेवक श्याम पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,विजय पवार,किरण माळी व युवक कार्यकर्ते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button