मोठा वाघोद्यात ५दिवस जनता कर्फ्यूत नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने सहभाग
५ दिवसांचा जनता कर्फ्यू सफल करण्याचे आवाहन
प्रतिनिधी मुबारक तडवी
मोठा वाघोद्यात तालुका रावेर येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढती संक्रमित रुग्ण संख्या थांबविण्यासाठी व संसर्गाची साखळी तोटण्यासाठी आर्थिक नुकसान सहन करीत गावाच्या हितासाठी निरोगी वाटचालीस मोठा वाघोदा गावातील ग्रामपंचायत महसूल प्रशासन,आरोग्य विभागासह गावकर्यांनी , सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवत जनता कर्फ्यू त सहभागी होत
अत्यावश्यक सेवेमधील ,दुध डेअरी चालक,किराणा दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन *कोरोनाची साखळी १००% खंडीत*करण्यासाठी ग्रामहित जोपासत सर्व व्यवसाय बंद ठेवत जनता कर्फ्यू ला
ग्रामस्थांतर्फे १००% प्रतिसाद मिळाला तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावून च बाहेर पडावे तसेच कोरोनाला घाबरु नका परंतु सामुहिक अंतर ठेवा. सोशल डिटंन्सिन चे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले याकामी ग्रामपंचायत प्रशासन,पदाधिकारी महसूल प्रशासन आरोग्य विभाग सर्व विभागांचे कर्मचारी सह पोलिस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे






