Maharashtra

?”बाई वाड्यावर या” महिलांसाठी एक शिवी….मराठी वाहिन्यांमधून सर्रास वापरली जाणारी….

? “बाई वाड्यावर या” महिलांसाठी एक शिवी….मराठी वाहिन्यांमधून सर्रास वापरली जाणारी…..क्रमशः

प्रा जयश्री दाभाडे

महाराष्ट्र तसा पुरोगामी विचारांचा…या महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक समाज सुधारकांनी सामाजिक, सांस्कृतिक, महिला प्रश्न यावर खूप मोठं कार्य केले परंतु मराठी चित्रपट सृष्टी तील काही गोष्टींना पायबंद बसला नाही.मराठी चित्रपट सृष्टी ला अत्यन्त मोठा वारसा आहे परंतु हा वारसा जपताना महिलांच्या सन्मानाचे भान जपले गेले नाही.आजही प्रसार माध्यमातून,मराठी वाहिन्यांमधून महिलांवरील अश्लिल विनोदावर टीआरपी वाढविली जाते.गंमत म्हणजे महिलाच महिलांवर अश्लिल विनोद करताना दिसतात. याच उत्कृष्ट नमुना म्हणजे चला हवा येऊ द्या चे अनेक एपिसोड…

पूर्वी नाच गाणे करून,तमाशाचे फड चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक महिला अस्तित्वात होत्या आणि आजही आहेत. मजबुरी,आर्थिक परिस्थिती, सामाजिक जीवन इ मुळे त्यांना सदर व्यवसाय करणे आवश्यक होते. आधुनिक काळात त्यांची नावे बदलली आहेत एव्हढेच..

?&Quot;बाई वाड्यावर या&Quot; महिलांसाठी एक शिवी....मराठी वाहिन्यांमधून सर्रास वापरली जाणारी....

मराठी चित्रपटांमधून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी दाखविल्या जात. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत नव्हते. त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई.गावातील जमीनदार,वतनदार श्रीमंत लोक सहजच त्यांना करमणूक करण्यासाठी त्यांच्या मोठ्या वाड्यांवर बोलवत असत.

मराठी चित्रपट सृष्टी तील प्रसिद्ध खलनायक निळू फुले ह्यांनी “बाई वाड्यावर या”असे म्हणत प्रचंड टाळ्या आणि प्रसिद्धी मिळवली.चित्रपट तुफान चालले .परंतु महिलांचा सन्मान,इज्जत,प्रतिष्ठा खालावते आहे याचा कोणी विचारच केला नाही.खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही रंगेल श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे. जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे.तर या रावजी बसा भावजी म्हणत शिट्यांचा आवाज दूर पर्यंत घुमत असे आणि आजही घुमतो.

मराठी चित्रपट सृष्टी ला टीआरपी मिळत गेली आणि महिलांचा दर्जा खालावत गेला.

पेशवा कालखंडा पासून खऱ्या अर्थाने सुरू झालेली महिलांच्या अधोगतीला जोरात वेगळे वळण मिळाले.दिग्दर्शक, कलाकार एव्हढेच नव्हे तर स्त्री कलाकार यांनी देखील या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत.

आधुनिक काळात याला वेगळे वळण मिळत गेले.माझ्या नवऱ्याची बायको,चला हवा येऊ द्या सारख्या मालिकांमधून स्त्रियांच्या बाबतीत केले जाणारे विनोद आणि कथानक तितकेच भयंकर आणि विचारात पडणारे आहेत.त्यावेळी असलेली स्त्रियांची मजबुरी आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मान चा फरक आहे परंतु तरीही आजही या सारख्या मालिकांमधून बाई वाड्यावर या म्हणत विनोद करून टाळ्या तर मिळविल्या जातात. स्त्रीचा, स्त्रीत्वाचा अपमान करत आहोत याचं भान त्यांना राहत नाही.मोठं मोठे सन्मान सोहळे,अवॉर्ड समारंभ यातूनही बाई पणाचं हे ओंगळ वाणं दर्शन होतच राहत.जणू तू फक्त उपभोग घेण्यासाठी च आहे याचं प्रत्येक मिनिटाला जाणीव करून देणार हे वातावरण आहे.

तू कितीही मोठी झाली, उच्च पदां वर कार्यरत असली तरी तुझी लायकी आणि जागा फक्त आणि फक्त भोग किंवा वाड्यावर किंवा आता बंगल्यावर येण्याचीच आहे याची जाणीव सतत करून दिली जाते. पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत.नावे बदलली आहेत.जागा बदलल्या आहेत.भाषा थोडीफार बदलली आहे. दृष्टिकोन मात्र तोच आहे.

तथाकथित महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना अश्या वेळी कुठे जातात काय माहीत? फक्त फोटो सेशन,बातम्या,चमकोगिरी यामुळे महिलांना सन्मान मिळणार नाही तर अशा सर्व लहान मोठ्या गोष्टी देखील विचारात घेतल्या पाहिजेत.

बाकी, ‘बाई वाड्यावर या’ म्हणून नाचणाऱ्या आताच्या पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधी नाही समजणार.

संबंधित लेख

One Comment

  1. संपादक मॅडम, आपला लेख हा मानसिप्रवृत्ती तथा स्त्री अस्तित्वाला भानावर आणण्याजोगा आहे

    स्त्री मनाचे लचके तोडण्याचे काम पुरातन काळापासून चालत आले आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे आणि तिने स्वतःला सजवावे व पुरुषांचे मनोरंजन करावे, तिची लायकी फक्त चूल आणि मुलं पैदा करण्यापूर्तीच आहे, तिची जागा पायातील चप्पल एव्हढीच आहे, स्त्रियांना शिक्षण दिल्यास धर्म भ्रष्ठ होतो, अश्या अनेक विचारांची संहिता(कायदा) धर्म ग्रँथात (मनुस्मृती, वेद, रामचरित्रमानस) पहावयास आपल्याला मिळतील. हाच पगडा आज ही आपल्याला मानसिवृत्ती मध्ये आढळून येते आणि याच मानसिकतेने पुरुष महिलांवर बलात्कार करतांना सर्वत्र दिसतात.

    खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने स्त्री ही सर्व क्षेत्रात कार्यरत दिसत आहे, याचे सर्व श्रेय संत (आजचे नाही) व महापुरुष (सनातनी विचारांचे सोडून) यांच्या महान कार्या मुळेच.

    आजच्या पिढीला पुरुषीमानसिकते मधून बाहेर पडून स्त्री-पुरुष समांतरचे विचारधारेला स्वीकारणे गरजेचे आहे तरच समाजव्यवस्था सुरळीत चालेल व देश विकसनशील नव्हे तर विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल.

Leave a Reply

Back to top button