Faizpur: फैजपूर येथे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी यांची उद्या जाहीर सभा
फैजपूर प्रतिनिधी
येथील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक फैजपूर नगरी येथे दिनांक १२ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ०९:३० वाजता लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी जवळ सावदा रोड फैजपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी महाराष्ट्र राज्यसभा खासदार व काँग्रेसचे नेते मुलुख मैदानी तोफ इमरान प्रतापगडी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. असे आवाहन रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व महाविकास आघाडी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.






