Maharashtra

Amazing: आणि महाराष्ट्रातील “हे” गाव उरल आहे फक्त कागदावर..! जाणून घ्या पूर्ण घटना..!

Amazing: महाराष्ट्रातील “हे” गाव उरल आहे फक्त कागदावर..!

महाराष्ट्रातील एक गाव आजही आपल्या अस्तित्त्वासाठी झगडत आहे. मूलभूत सोयी-सुविधा नसल्याने गेल्या काही वर्षात या गावातील सर्वच कुटुंब दुसऱ्या गावात स्थलांतरित झाली आहेत. हे गाव म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेले घुरखेडा. तर मग या गावाची कहाणी नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील नांदेडच्या पूर्वेला चार कि .मी. अंतरावर तापी काठावर घुरखेडा हे गाव वसले होते. हे गाव नांदेड ग्रामपंचायतीला जोडले होते. गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटीलदेखील होता. गावात 50 ते 60 घरे देखील होती. मात्र, पाण्याची व्यवस्था नसल्याने नदीवरून पाणी आणावे लागत होते. तसेच गावात डॉक्टर नव्हता. रस्ता आणि इतर कोणत्याही सुविधा नव्हत्या. त्यामुळे हळूहळू गावकऱ्यांनी नांदेडमध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली. त्यानंतर गाव ओसाड झाले. आता घुरखेडा फक्त कागदपत्रांवर आणि वृद्ध गावकऱ्यांच्या आठवणीत शिल्लक आहे.
सध्या घुरखेडा म्हणवल्या जाणाऱ्या गावात टेकडीवर आता सपाटीकरण झाले असून गाव आता ओसाड पडले आहे. तिथे मारुतीच्या मंदिरासह दोन तीन लहान मंदिरे पूर्वी गाव असल्याची साक्ष देत आहेत. त्याच ओसाड मैदानावर आता रघुनाथ कोळी यांचा गोठा आहे. या आमच्या गावात पाणी, रस्ते,गटारी, लाईट यासह मुलांना शिक्षणाची कुठलीही व्यवस्था नव्हती. अनेक वेळा लोकप्रतिनिधींना सांगूनही कुठलाही फायदा झाला नसल्याने आम्ही गाव स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यांच्या सीमेवर हे गाव होते. अमळनेर महसूल प्रशासनाच्या पात मंडळाच्या सावखेडा महसूल सजात घुरखेडा शेतीशिवार येते. पण घुरखेडा या गावातील नागरिकांनी नांदेड गावात स्थलांतर केले असून ते गाव आता फक्त कागदावरच राहिले आहे. या गावात रामेश्वरमसारखे प्रसिद्ध देवस्थान असून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र, तिथे जाण्यासाठी आणि तेथील सुखसुविधा नसल्याने ग्रामस्थांचे, भाविकांचे मोठे हाल होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून व्यवस्था करावी, अशीच मागणी केली जात आहे.

अमळनेर तालुक्याच्या निर्मितीच्या आधी नांदेड, नारणे आणि घुरखेडा हा भाग अमळनेर तालुक्यात होता. त्यानंतर नांदेड आणि नारणे ही गावे धरणगावला जोडली गेली. मात्र, घुरखेडा शेतीशिवार अमळनेर तालुक्यातच आहेत. या गावातील तीन मंदिरे या गावाची साक्ष देत असून आता या गावात एकही नागरिक रहिवासी करीत नाही. तर आता हे गाव फक्त कागदावरच दिसून येत आहे. या गावात जर मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाल्या तर निश्चित हे गाव पुन्हा बसू शकेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button