Bollywood

Bollywood Stories: आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात पोहचली एक्स गर्लफ्रेंड…! झाला राडा..

Bollywood Stories: आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात पोहचली एक्स गर्लफ्रेंड…! झाला राडा..

शो मॅन राज कपूर आणि अभिनेत्री नरगिस यांची जोडीनं बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. दोघांची ऑनस्क्रिन प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. 1-2 नाही तर दोघांनी मिळून तब्बल 16 हून अधिक सिनेमात एकत्र काम केलं. ही जोडी ऑनस्क्रिन जितकी लोकप्रिय आणि चर्चेत होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक ऑफस्क्रिन चर्चेत होती. नरगिस आणि राज कपूर यांचं अफेअर संपूर्ण बी टाऊनला ठावूक आहे. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. प्रेम असूनही ते एकमेकांचे होऊ शकले नाही. ब्रेकअपनंतर जवळपास 24 वर्षांनी नरगिस ऋषी कपूरच्या लग्नात पोहोचली होती. हा किस्सा बऱ्याच जणांना माहिती नसेल.

राज कपूर आणि नरगिस यांची जोडी ऑनस्क्रिन जितकी सुंदर होती तितकीच ती ऑफस्क्रिन देखील होती. जेव्हा सुनिल दत्तनं मदर इंडिया सिनेमाच्या शुटींग दरम्यान नरगिसला आगीतून वाचवलं तेव्हा मात्र या लव्हस्टोरीचा शेवट झाला. राज कपूर यांचं लग्न झालं होतं. ते 4 मुलांचे वडील होते. विवाहीत असलेल्या राज कपूरबरोबर नरगिसला लग्न करायचं होतं. पण राज कपूर काही झालं तरी बायको आणि मुलांना सोडायला तयार नव्हते.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या बायोग्राफीमध्ये काही किस्से लिहिलेत. त्यातील एक किस्सा असा होता की, राज कपूर आणि नरगिस विभक्त झाल्यानंतर तब्बल 24 वर्षांनी नरगिस ऋषि कपूरच्या लग्नात आली होती. 1956मध्ये जगते रहो हा सिनेमा केल्यानंतर नरगिसनं RK स्टुडिओमध्ये पाऊल ठेवलं नव्हतं. त्यादिवशी सुनील दत्तबरोबर ऋषी कपूरच्या लग्नाला पाहुणी म्हणून नरगिस RK स्टुडिओत आली होती. 24 वर्षांनी नरगिस तिथे येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती देखील बिथरल्यासारखी झाली होती.
विवाहीत राज कपूर ज्या स्त्रीच्या प्रेमात होता तिला आपल्या मुलाच्या लग्नात पाहून राज कपूरची पत्नी कृष्णा कपूरला देखील थोडा त्रास झालाच होता. राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर नरगिसजवळ गेल्या. नरगिसची शांतता पाहून त्यांना थोडाफार अंदाज आहे. त्या नरगिसला म्हणाल्या, “माझा नवरा हँडसम माणूस होता. खूप रोमँटिक होता. मी आकर्षण समजू शकते. मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय. पण प्लिज भूतकाळ आठवून स्वत: त्रास करून घेऊन नका. माझ्या घरी आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी तुम्ही आला आहात. आपण इथे मैत्रिणी म्हणून आहोत”.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button