नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, कॉबींग / नाकाबंदी दरम्यान एकुण 4 अग्निशस्त्र, 5 जिवंत काडतुस, 3 धारदार शस्त्रांसह घरफोडीच्या गुन्ह्यातील व इतर गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात
नंदुरबार फहिम शेख
मागील काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या नातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली दिनांक 11/12/2021 चे रात्री नंदुरबार जिल्ला ऑपरेशन ऑल आउट फोग/नविण्यात आले होते. ऑपरेशन ऑल आऊटचा मुख्य उद्देश हा आगामी काळात साजरे होणारे सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण करून शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समजाकंटक व गुन्हेगारांवर चचक निर्माण व्हावा असा होता. या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ला पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण होत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन कल ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गंग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलले, चारीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणार, Drunk and Drive, कारागृहातून सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवून जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवून त्यांचेविरुद् कायदेशीर कारवाई करणयावतच्या तसेच मालमत्तेविरुध्द गुन्हे उघडकीस आणणेच्या सूचना मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व उप-विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या दिनांक 11/12/2021 थे रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले पासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 50 अधिकारी व 368 अमलदार नेमण्यात आले होते व संपूर्ण ऑल आऊटचे नेतृत्व मा. पोलीस अधीक्षक, नंदरवार श्री. पी. आर. पाटील स्वत: करुन नाकाबंदी कॉग ऑपरेशन ऑपरेशन ऑल आऊटा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. मा. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करन कारवाई करीत होते. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 28 इसम दारु पिवून वाहन चालवितांना मिळून आल्याने त्यांचे विरुद् नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना मोटार वाहन कायदा कलमान्वये 28 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा पोलीस ठाणे अभिलेखावरील 5. ना उघड घरफोडीचे गुन्हयातील इनव्हर्टर, बॅटरी अॅम्पलीफायर LED TV व तिखांरा ता शहादा येथील पदमावत माता मंदीतील देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगसूत्र असा मुद्देमाल व 50 हजार रुपये किमतीची एक मोटार सायकल,
चोरीचा गुन्हा अस शहादा पोलीस ठाण अभिलेखावरील 6 गुन्हे उघडकिस आणुन 4 आरोपीतांकडून 1 लाख 62 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शहादा पोलीस ठाणे हडतील लोहारा गावातील शानाभाऊ आकार माळी यांचे शेतातील 3200/- रु. कि. चे कापसाच्या तीन गोएया 160 कि.मै. वजनाच्या कापूस चोरीचा गुन्हा देखील उपडकिस आणुन आरोपीताकडून 3200/- रु. कि. चे कापसाच्या तीन गोण्या 160 कि. ग्रॅ. वजनाचा कापुस हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मालमत्ते विरुध्दचे एकुण 8 गुन्हे उघडकिस आणुन 1 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 05 आरोपीतांना ताब्यात घेतलेले आहे. करून
नंदुरबार शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील वायर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतास ताब्यात घेवून 30 हजार रुपये किमतीची प्रीफेज वायर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच महसावद पोलीस ठाणे हड़तील सुलवाडे जिल्हा परिषद शाळेतील घरफोडीचा गुन्ह्यातील 3 हजार रुपये किमतीचे 2 सिलेंडर हस्तगत करण्यात आलेले आहेत. असे एकुण मालमत्तेविरुद्धचे एकुण 09 गुन्हे उघडकिस आणुन एकुण । मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 92 रुपये किमतीचा
तसेच कॉविंग ऑपरेशन दरम्यान नंदुरबार ते दोंडाईचा रोडवर कृषी महाविद्यालय जवळ मांडूळ जातीचा सर्प विक्री करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनासह 3 आरोपी मिळून आल्याने त्यांचेकडुन लाख किमंतीचा 4 कि.ग्रॅ. वजनाचा मांडळ (सर्प) व 5 लाख 29 हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकूण 15 लाख 29 हजार रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात येवून त्यांचे विरुध्द् वन्य प्राणी संरक्षण अधिनियमान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 12 रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाण विविध पालास टाणत गुन्ह
दाखल करण्यात आल त्याचकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. 07 संशयीत इसमांच्या ताब्यात मिळून आलेल्या मालमत्ते बाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याचेविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नंदुरबार शहर धडगांव, सारंगखेडा पोलीस ठाणे अभिलेखावरील फरार असलेल्या || आरोपीतांना देखील ताब्यात घेण्यात आले त्यांना मा. न्यायालयात पाठविण्यात आले आहे ऑपरेशन ऑल आकट दरम्यान 30 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये 1 लाख 46 हजार 464 रुपये किमतीची देशी विदेशी दारु, बियर असा मुद्देमाल व 65 हजार रुपये किमतीची अवैध दारुची वाहतुक करणेकामी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच धडगांव गावात स स्थानकासमोर महाराष्ट्रात प्रतिबंधोत केलेला 37 हजार 290 रुपये किमतीचा विमल गुटखा व 53 हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 90 हजार 290 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने एका आरोपीविरुद्धडगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहादा पोलीस ठाणे होतील शिरु बाफुलीवर एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना मिळाल्याने त्यांनी शहादा पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबवित असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे व पालीस अर्मलदार विजय हिवरे यांनी शिरुड चौफुलीवर जावून संशयोतास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्णात 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व हजार रुपये कि ये एक पिवळ्या धातुचे दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याचे विरुद्ध शहादा पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना नंदुरबार शहरात टापू परिसर ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे गावठी कट्टा कब्जात बाळगुन • संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 55,000/- रु. कि. 02 गावठी बनावटीचे लोंखडी पिस्टल व 1500/- रु. कि. 03 पिवळ्या रंगाचे धातुचे जिवंत काडतुस एकुण 56500/- रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच नवापुर शहरात लखानी पार्क परिसरात देवळफळी ते लहान चिंचपाडा जाणाऱ्या रोडालगत एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे गावठी कट्टा कब्जात बाळगुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 25,000/- रु. कि. 01 गावठी बनावटीचे लोंखडी पिस्टल व 1000/- रु. कि. 02 पिवळ्या रंगाचे धातुचे जिवंत काडतुस एकुण 26000/- रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचे विरुद् नवापुर पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच नवापूर, विसरवाडी, शहादा पोलीस ठाणे हद्दतीत संशयीत इसमांकडे मानवी जिवीतास घातक असलेली तलवार, गुप्ती, चाकु मिळुन आल्याने 3 आरोपीतांविरुध्द् भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे गैरकायदा लोखंडी हत्यार कब्जात बाळगतांना मिळुन आलेल्या 3 आरोपीतांकडुन 8 हजार 500 रु. किं.च्या 3 तलवार, चाकु, गुप्ती हस्तगत करण्यात आलेल्या आहेत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दतील वैंदाणे गावातून शासनाची कुठलीही परवानगी नसतांना दोन आरोपी वाळुची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीतांच्या ताब्यातुन एक ब्रास वाळु, 3,53,000/-रु.कि. सोनालीका कंपनीचे निळया रंगाचे ट्रक्टर क्र. MH-18 BC-2202, 1200/- रु. कि. 06 प्लास्टीकच्या दगाऱ्या व 06 फावडे असा एकुण 3 लाख 54 हजार 200 रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन दोन्ही आरोपीतांविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे • गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असुन पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी ) योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.






