अवैध वाळू प्रकरण लागले सावदा तलाठी यांच्या जिव्हारी?
वार्ताहरांशी हुज्जत घालून दिली धमकी
——————————————————–
“वाळूही शासकिय संपत्ती असल्याची अधिकृत माहिती असताना त्याची खुलेपणाने सुरु असलेली तस्करीवर प्रतिबंध घालण्या ऐैवजी तलाठी वाळूचे गैरप्रकार उघडकीस करणाऱ्या वार्ताहरांनाच जर धमकी देत असेल तर एक प्रकारे त्यांचा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दिसून येते.आणि हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.याबाबत लवकरच आवाज बुलंद करणार,अशी प्रतिक्रिया यावेळी रावेर तालुका ग्रामिण पत्रकार संरक्षण समितीचे ता.अध्यक्ष प्रदिप महाराज यांनी दिली”
———————————————————
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- शासनाच्या वतीने सरसकटपणे वाळूवर बंदी असताना सुद्धा,रावेर तालुक्यात असलेल्या सावदा तलाठी कार्यालयच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची वाहनाद्वारे उघडपणे वाहतूक होत असून शहरात अनेक ठिकाणी वाळूचे ढिग दिसून येते,यापेक्षा अश्चार्यची बाब अशी की,थेट सावदा तलाठी कार्यालयच्या समोर व हाकेच्या अंतरावर एका नविन तळघराचे बांधकामासाठी तस्कर वाहनाद्वारे अवैध वाळू उघडपणे येथे टाकून जात आहे.याबाबत वृत्तपत्रात बातम्याही प्रसारित झाल्या,तरी देखील या बांधकामासाठी दि.३१ मार्च रोजी सकाळी वाहनाद्वरे वाळू आणल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने दिली. याची खात्री करण्यासाठी गेलेले वार्ताहर युसूफ शाह व फरीद शेख आणि दिलीप चांदेलकर यांना येथे वाळूचा ढिग दिसला असता वृत्त संकलनासाठी त्यांनी याचे मोबाईल फोनमध्ये वाळूचे छायाचित्र काढून सदरील प्रकार समोरच असलेल्या तलाठी कार्यालयात जाऊन येथील तलाठी शरद पाटील यांच्या निदर्शनास देत आता या अवैध वाळू बाबत आपण काय कारवाई करणार असा प्रश्न विचारतच”तुम्ही कशासाठी आले मला माहिती आहे,तुम्ही बातम्या प्रसारित केले आणखीन करा,तुम्हाला जे काही करायचे आहे ते तहसीलदार यांच्या कडे जावून करा,वाळूचा विषय तुम्ही फक्त पैसेसाठी उचलत आहे.वेळप्रसंगी मला जे करायचे असेल ते मी तुमच्या विषयी करु शकतो हे लक्षात ठेवा.”अशा प्रकारे त्यांनी अशोभनीय भाषेत धमकी दिल्याने या तलाठीस तात्काळ निलंबित करण्यात यावे.तसेच त्यांचे विरोधात फिर्याद दाखल करणेबाबत crpc चे कलम १९७ अन्वे लवकरच परवानगी द्यावी.अशी मागणीची लेखी तक्रार आज रावेर तहसीलदार यांच्या कडे वार्ताहर फरीद शेख,युसूफ शाह सह रावेर तालुका ग्रामिण पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष प्रदिप महाराज यांनी केली आहे.






