Amalner

? आंधळं दळतंय कुत्रं पिठ खातंय..नगरपरिषदेची अवस्था…दिव्यांगाची उपेक्षा..

? आंधळं दळतंय कुत्रं पिठ खातंय..नगरपरिषदेची अवस्था…दिव्यांगा ची उपेक्षा..कोरोनाची लागण होऊन दोन चार दिव्यांग बाधित होतील तेंव्हा नगरपरीषद जागी होईल का?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर

देशात 21 दिवसांच्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना घरपोच सुविधा मिळण्यासंदर्भात शासनाच्या दि 26 मार्चच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालय ,महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र सोई-सुविधा/2019-20/1011 च्या आदेशानुसार दिव्यांगांना आरोग्य किट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात मा. ना.बच्चू भाऊ कडू प्रहार अपंग संस्था,महाराष्ट्र राज्य,प्रणित अमळनेर संघटनचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी सुरुवातीला भ्रमणध्वनी वरून मा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे प्रतिनिधी माजी आमदार कृषि भूषण साहेबराव पाटील यांच्याशी सदर आदेशा नुसार दिव्यांगांना आरोग्य किट मिळावे याबाबत दोन तीन वेळा संपर्क साधला. परंतु कोणत्याही स्वरूपाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटने तर्फे दि.1 एप्रिल रोजी मा उप मुख्याधिकारी संदीपजी गायकवाड यांना वरील विषयासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.परंतु आज पाच दिवस उलटून गेल्यावरही कोणतीही सकारात्मक कार्यवाही नगरपरिषद प्रशासनाने केलेली नाही.वरील विषयासंदर्भात अमळनेर च्या उपविभागीय अधिकारी मा सिमा अहिरे यांना देखील सदर विषयाची माहिती देण्यात आली आहे. व त्यांच्या मागणी नुसार शासनाचे आदेशही व्हाट्सअप द्वारे त्यांना दिले आहे.

वरील संदर्भात स्थानीक स्वराज्य संस्था अमळनेर नगरपरिषद यांनी एक समिती स्थापन करून शहरातील दिव्यांग बंधू आणि भगिनींना वरील आदेशाप्रमाणे आरोग्य किट देने बंधनकारक आहे. पण अमळनेर नगरपरिषद कडून आज पर्यंत कोणतीही समिती गठीत करण्यात आलेली नाही तसेच पत्रालाही कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

एकप्रकारे दिव्यांग बांधवांची ही चेष्टा किंवा अवहेलना अमळनेर नगरपरिषद करत आहे. सामान्य माणसाच्या तुलनेत दिव्यांग हे शारीरिक दृष्टीने कमकुवत असतात त्यामुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते व ते कोणत्याही संसर्गजन्य आजाराला लवकर बळी पडू शकतात याचे गांभीर्य लक्षात न घेता अमळनेर नगरपरिषद दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे.

जी काही मदत करावयाची ती लवकरात लवकर घरपोच करावी अन्यथा दिव्यांगांची परिस्थिती पाहता भीक नको.. पण कुत्रं आवर..अशी आहे.अश्या भावना दिव्यांग बांधवांकडून व्यक्त होत आहेत.

लवकरात लवकर या आदेशाची अंबलबजावणी न झाल्यास जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे व कामात कसूर आणि शिस्त भंग कार्यवाहीची मागणी प्रहार अपंग क्रांती चे अमळनेर शहराध्यक्ष म्हणून योगेश पवार करणार असल्याचे त्यांनी ठोस प्रहार शी बोलताना सांगितले.तसेच दिव्यांग बांधवानी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी शासन जरी आपल्या पाठीशी नसले तरी प्रहार संघटना आपल्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अश्या भावना योगेश पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button