Pune

अनुसूचित जमाती विविध विभागातील जागा भरा – बिरसा क्रांती दल राजगुरूनगर मागणी

अनुसूचित जमाती विविध विभागातील जागा भरा – बिरसा क्रांती दल राजगुरूनगर मागणी

पुणे / प्रतिनिधी दिलीप आंबवणे

पुणे जिल्ह्यातील विविध विभागातील अनुसूचित जमाती पदभरती जाहिरात तात्काळ काढण्यात यावी अशी मागणी बिरसा क्रांती दल खेड तालुका वतीने जिल्हाधिकारी यांना नायब तहसिलदार राजेश कानसकर यांच्या मार्फत निवेदन द्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय अपील क्रमांक 8928 /2015 माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांची रिट याचिका क्रमांक 3140/ 2018 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2019. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील क्रमांक एकूण 8928/ 2015 ( चेअरमन अँड मॅनेजमेंट डायरेक्टर एफसीआय आणि इतर विरुद्ध जगदीश बालाराम बहिरा व इतर ) व इतर याचिका यामध्ये दिनांक 6 जुलै 2017 रोजी मागास जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरविलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण ठरत नाही असा निर्णय दिलेला आहे.

माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांची रिट याचिका क्रमांक 3140/2018 मध्ये दिनांक 28 /9 /2018 च्या आदेशान्वये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व प्रशासकीय विभागाने त्यांच्या आधिपत्याखाली कार्यालयातील अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या व त्यानंतर विशेष मागास प्रवर्गाचे अथवा अन्य कोणत्याही मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केले असल्यास व अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त दर्शवित या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर दर्शवून रिक्त झालेल्या जागाकरता दिनांक 14/12/ 2019 ते 27/ 12/ 2019 या कालावधीत जाहिरात देऊन सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार पदभरती काढण्यात यावी त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालये सेवा मंडळी, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महामंडळे शासकीय अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम व शासकीय आधिपत्याखालील किंवा शासकीय अनुदानित किंवा दिलेल्या दिलेले महामंडळ व इतर विभागाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता विहित कालावधीत जाहिराती प्रसिद्ध होणे आवश्यक होते. परंतु आपल्याला जिल्ह्यातील एक दोन विभाग सोडले तर अनेक विभागातून कुठल्याही पदाची जाहिरात अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही
सबब माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी तसेच शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2019 चे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील सर्व विभागांना जाहिरात काढण्यात येतात सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राहुल आढारी, खेड तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, उपाध्यक्ष संतोष भांगे, सरपंच सुधिर भोमाळे, सरपंच शशिकांत वाजे, सरपंच सोमा किरवे, संकेत झांजरे, कुंडलीक बुरूड, यशवंत शिंगाडे, चंद्रकांत वासाळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button