India

?️ Big Breaking..फेसबुक, व्हाट्सएप,इन्स्टा ठेवतात आपल्यावर नियंत्रण…जाणून घ्या कसा आहे नियंत्रण अजेंडा…

?️ Big Breaking..फेसबुक,गुगल व्हाट्सएप,इन्स्टा ठेवतात आपल्यावर नियंत्रण…जाणून घ्या कसा आहे नियंत्रण अजेंडा...

प्रा जयश्री दाभाडे

आपण सर्वच फेसबुक, गुगल,ट्विटर आणि व्हॉट्सअप हे सर्व सोशल मीडियाचा वापर करतो.आपण ह्या सर्व सेवा वापरताना फक्त इंटरनेट डेटा वापरतो. वरील सर्व सोशल मिडिया ला आपण पैसे देत नाही. मग हे सर्व ऍप चाललात कसे.यांना कसा फायदा होतो? का हे सर्व ऍप चालवायला कस परवडत?या सर्व प्रश्नांची उत्तरे तर शोधणं आवश्यक आहे च पण आता नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे या सर्व सोशल मीडिया वेबसाइट्स आता आपल्या आवडी, नावडी आणि आपल्या वर्तनावर घडामोडींवर नियंत्रण ठेवत आहेत. या सोशल मीडिया कंपन्यांसाठी आपण एक कमाईचा महत्वाचा स्रोत आहोत. हा सर्व सोशल मिडिया कमांड करत आहे आपणा सर्वांना.. एका विशिष्ट विचारधारेला धरून किंवा निवडणुकीदरम्यान एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपले मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हे सर्व वेगळं आणि विचित्र वाटतंय ना ? परंतु हे खरं आहे आणि आपण आता ह्या सर्व सोशल मिडिया चे कठपुटली झाले आहोत. एका विशिष्ट सर्वेक्षणा नुसार फेसबुक, ट्विटर आणि गुगल सारख्या कंपन्यांनी जगातील सर्व देशांच्या राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. एक प्रकारचे मोठे स्कॅन्डल बनावट बातम्या पसरवून,न पटणाऱ्या लोकांविरूद्ध बनावट रोष निर्माण करून एखाद्या सत्ताधारी सरकारला पाडू देखील शकतात.

या बाबतीत भारत सर्वात सोपा बकरा ठरू शकतो. कारण भारतातील सर्वात जास्त जनता वरील सर्व ऍप वापरतात.भारत7जनता लवकर बळी पडते कारण एका विशिष्ट पातळीवर भारतीय जनता भावूक असते .याच उत्कृष्ट उदा म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात भारतात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांना चुकीच्या पद्धतीने प्रमोट करण्यात वरील सर्व मिडीया आघाडीवर होता.आपल्याला असे वाटते की गूगल हे एक शोध इंजिन आहे पण गुगल वर जी माहिती उपलब्ध करून दिली जाते ती किती विश्वसनीय असते?ती खरी असते का?आपण नीट परीक्षण केले तर एका विशिष्ट दृष्टिकोनातून च माहिती दिली जाते.हे थोडं वेगळं वाटेल पण ते वास्तव आहे.

फेसबुक हे मित्र परिवाराशी संपर्क साधण्याचे उत्तम साधन म्हणून आहे असं आपल्याला वाटत.परंतु लोकांनी फेसबुकवर टाकलेल्या कोणत्या पोस्ट ठेवायच्या कोणत्या डिलीट करायच्या ह्याचा एक नियम किंवा अजेंडा ठरलेला असतो.

सध्या जगभरात अशी चर्चा होत आहे की फेसबुक आणि ट्विटर एखाद्या विशिष्ट पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या बाजूने कार्य करत आहेत का ?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत फेसबुकने कॉंग्रेसची सुमारे 700 पाने पेज वरून काढून टाकली होती,तर भाजपाला पाठिंबा देणारी एक हजार पानेही काढून टाकण्यात आली होती.

भारततातील फेसबुकवर पोस्ट केलेल्या गोष्टी तपासण्यासाठी बाहेरील एजन्सींकडून जर मदत घेतली जात असेल तर हे अधिकारी किंवा कर्मचारी एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहेत आणि त्यांचा काही राजकीय पक्षांशी संबंध देखील आहे.

हे सर्व सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आता आपले व्यक्तिमत्त्व आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणत आहेत.ह्या सर्व सोशल मिडिया कंपन्या आपल्यावर लक्ष ठेवतात. ते आपल्याशी संबंधित प्रत्येक डेटा रेकॉर्ड करतात. आपल्या वैयक्तिक जीवनात काय चालले आहे याची नोंद देखील ठेवतात.

हे वैयक्तिक तपशील जाणून घेतल्यानंतर आपली विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करतात. गुगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे कोट्यवधी लोकांची माहिती ठेवण्यासाठी मोठी डेटा सेंटर्स तयार केली आहेत.

पण आता याबद्दल हळूहळू जागरूकता निर्माण होत आहे. थायलंड सरकारने आज घेतलेल्या एका आश्चर्य निर्णयात गुगल आणि फेसबुकविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. यापूर्वी थायलंडच्या एका कोर्टाने फेसबुक आणि यूट्यूबवरुन 3000 सामग्री हटवण्याचे आदेश दिले होते. फेक न्यूज आणि अश्लील सामग्री समाविष्ट असलेली सामग्री लोकांची विचारसरणी बदलण्यासाठी उघडपणे पसरविली जात होती.आणि याला थायलंड सरकारने विरोध केला आहे.

सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोशल मीडिया पोस्ट्स अत्यंत विचारपूर्वक सामायिक केल्या पाहिजेत.

कोणत्याही सोशल मीडिया कंपनीची तीन मुख्य उद्दिष्टे आणि पद्धती असतात त्या म्हणजे ऍप ची सुरुवात ज्या अंतर्गत लोकांना सवय होते मग त्यात वाढ होते, ज्यात लोक आपल्या मित्रांसह नेटवर्क बनवतात तेव्हा लोक त्याच्या विस्ताराचे माध्यम बनतात. यातील सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे महसूल जो आम्ही पाहिलेल्या जाहिरातींद्वारे मिळविला जातो. या टप्प्यावर, फेसबुक आपल्या वागण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवते.

कोविड -१९ साथीच्या आजारामुळे जगभरातील लोक सध्या सामाजिक अंतर पाळत आहेत आणि जास्तीत जास्त काळ सोशल मीडियाचा उपयोग होतो आहे. याद्वारे ते एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत.

जगात सर्वाधिक फेसबुक वापणाऱ्यांची संख्या भारतात आहे आणि 2023 पर्यंत ही संख्या 45 कोटी होऊ शकते.फेसबुकनंतर व्हॉट्सअप हे भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर सध्या इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे चिंता जनक असून युजर्स नी सावधानता बाळगावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button