Amalner

Amalner: अमळनेरातील सत्ता “ब” मिळकत धारकानो संपर्क साधा..!भाजपाचे विधानसभाक्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांचे आवाहन

Amalner: अमळनेरातील सत्ता “ब” मिळकत धारकानो संपर्क साधा..!भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांचे आवाहन

अमळनेर-शहर आणि ग्रामीण भागातील सत्ता “ब”अंतर्गत असलेल्या मिळकत धारकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाचे अमळनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात जाणकार मंडळींचे मार्गदर्शन आणि मदत घेऊन सर्वाना दिलासा मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.
अमळनेर शहर व ग्रामीण भागात ब सत्ता अंतर्गत अनेक मिळकती असून मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने सत्ता ब धारकांना क आणि खरेदी विक्रीचे अधिकार बहाल करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्याने अश्या अनेक मिळकत धारकांनी मार्च 2022 पर्यंत अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केले होते,मात्र सदर अर्ज सादर केल्यानंतर पुढे काय हालचाली झाल्या यांच्या कोणतीही माहिती प्रशासनाकडून मिळकत धारकांना मिळू शकलेली नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळेच या विषयाकडे देशमुख यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले असून ज्यांनी मागील वर्षी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज केले असतील त्या अर्जाच्या झेरॉक्स प्रती ते संकलित करीत आहेत,जेणेकरून प्रशासन आणि शासन दरबारी पाठपुरावा करणे त्याना सोईचे होणार आहे,यासंदर्भात स्थानिक जाणकार लोकांची एक लहान समिती देखील गठीत करून लवकर बैठक देखील ते घेणार आहेत.तरी ज्या ब सत्ता मिळकत धारकांनी मागील वर्षी अर्ज केले असतील त्यांनी शितल देशमुख,पवन चौक,अमळनेर मोबा-,9028107794 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शितल देशमुख यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button