सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मित्रपरिवाराकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप.
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: राज्यात सध्या लाॅकडाऊन स्थिती मध्ये अनेक गरजूंना सामाजिक संस्था व दानशुरांकडून अन्नधान्याच्या मदतीचा ओघ सुरु आहे. इंदापूर तालुक्यातील रूई गावातही सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आकाश कांबळे आणि मित्रपरिवाराकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
रुई गावातील विधवा, निराधार, गरीब, गरजू अशा दोनशे कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतका किराणा व भाजीपाला मोफत देण्यात आला.यावेळी शासनाने घालून दिलेले सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन देखील करण्यात आले.सध्या महाराष्ट्रासह जगावरती कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे रोजंदारीवर आपल्या संसाराचा गाडा घोढणा-यांच्या हाताला काम नाही त्यामुळे त्यांपुढे मोठे संकट आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून आकाश कांबळे व मित्र परिवाराने गरजू कूटूंबांना अन्नधान्याचे वाटप केल्याचे स्वतः आकाश कांबळे यांनी सांगितले.
यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, चहा पावडर व भाजीपाला यांचा यामध्ये समावेश असून यावेळी गावचे उपसरपंच दीपक साळुंखे, माजी सरपंच यशवंत कचरे, रुई गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग डोंबाळे, प्रीतम लावंड, पप्पू कोकरे, बंडू तात्या पुणेकर आदींसह या इतरांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले आहे.






