Maharashtra

अपात्र नगरसेवकांची दि ८रोजी सुनावणी….

अपात्र नगरसेवकांची दि ८रोजी सुनावणी….

अपात्र नगरसेवकांची दि ८रोजी सुनावणी....

अमळनेर 

    येथील 26 नगरसेवकांच्या वरील अपात्रतेची  सुनावणी दि 8 रोजी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे आहे. अतिक्रमण हटाव या मोहिमेस  स्थगिती दिल्याच्या प्रकरणात 26 नगरसेवकांवर विरोधी पक्षनेते गटनेते प्रवीण पाठक , सलीम टोपी व सविता संदानशिव यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारींनी २२ नगरसेवकांना अपात्र केले होते नगराध्यक्षांबाबत निर्णय राखीव ठेवला होता.त्यावर सत्ताधारी गटाने नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (४) प्रमाणे अपील दाखल केले होते.
सुनावनीला स्वत: किंवा वकिलमार्फेत हजर न राहिल्यास एकतर्फी निर्णय घेण्याचा इशारा २६ नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
नगरपरिषदेच्या नगरसेवकांच्या अपात्रतेप्रकरणी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे ८ रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून आजच नगराध्यक्षांसह २६ नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे.  दि  ८ रोजी दुपारी २ वाजता मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुनावणी होणार असून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील , शीतल पाटील , नूतन पाटील,संतोष पाटील,सुरेश पाटील ,नरेंद्र संदानशिव,निशान बानो कुरेशी , मनोज पाटील , गायत्री पाटील ,चेतना पाटील ,विवेक पाटील,निशांत अग्रवाल ,संजय मराठे , चंद्रकला साळुंखे , रामकृष्ण पाटील,राजेश पाटील, कमलबाई पाटील,रत्नमाला महाजन ,रत्ना महाजन ,विनोद लांबोळे, प्रवीण पाटील ,सलीम शेख फततु,अभिषेक पाटील,प्रवीण पाठक, सलीम शेख , सविता संदानशीव यांना महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी यांनी नोटीस काढली आहे व स्वतः किंवा वकीलाने आवश्यक त्या कागद पत्रांसह हजर राहण्याच्या सुुुचना केल्या आहेत
 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button