Amalner

Amalner: प्रा अशोक पवार पुरोगामी कार्यकर्ते घडवणार निरंतर विद्यापीठ …….वाढ दिवसाच्या सत्कार समारंभात मान्यवरांचे उद्गार

प्रा अशोक पवार पुरोगामी कार्यकर्ते घडवणार निरंतर विद्यापीठ …….वाढ दिवसाच्या सत्कार समारंभात मान्यवरांचे उद्गार

अमळनेर:
रियाज़ शेख आणि त्यांचा मित्र परिवाराने
अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी च्या माध्यमातून गांधलीपुरा येथे प्रा अशोक पवार यांच्या वाढ दिवसाच औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी होते, त्यांनी अनेक जुन्या आठवणीला उजाळा दिला. महाराष्ट्रभर पुरोगामी विचारांची पताका फडकवणारे प्रा अशोक पवार हे खऱ्या अर्थाने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. संस्थांमधील राखीव जागांचा प्रश्न असो मिल कामगारांचा प्रदीर्घ लढा असो, विद्यार्थी चळवळी,प्राध्यपकांचा महाराष्ट्र व्यापी संप यासारख्या असंख्य आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक राहिलेले पवार सर सतत उपक्रमशील कार्यकर्ते म्हणून जगतात. त्यांच्याकडुन अनेकांनी प्रेरणा घेऊन मोठी पद हस्तगत केली आहेत.
ते कार्यकर्ते निर्माण करून सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.नागरी हित दक्षता समितीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यात समितीची भूमिका अनेकांना सुखावणारी अशीच आहे.
कार्यक्रमाचे प्रसताविक अध्यक्ष रियाज़ शेख यांनी केले
अशोक बिऱ्हाडे, बन्सीलाल भागवत ,संदीप घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा अशोक पवार यांचे कार्यावर प्रकाश टाकला.
सुत्रसंचालन एॅड रज़्ज़ाक शेख यांनी तर आभार प्रदर्शन इकबाल शेख साहेब यांनी केले
सत्काराला उत्तर देतांना प्रा अशोक पवार सर यांनी सतत कार्यकर्ते घडवत राहणे, त्यांना बोलत करणे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सक्रिय ठेवण्याचं काम पुढेही करत राहणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील, गौतम मोरे,चेतन शाह,प्रा.डाॅ. लिलाधर पाटील,रमेश शिरसाठ,डी एम पाटील,अशोक पाटील,प्रेमरज पाटील,एस सी तेले,प्रदीप कंखरे,डी ए धनगर,शशिकांत आढावे,राजेन्द्रशिंग पाटील,सामाजिक कार्यकर्ते नसीर हाजी साहब,नगर सेवक सलीम टोपी,सुनील चौधरी,जाकीर भाई रद्दी वाले,जहुर मूतवल्ली,युसूफ पेंटर,इम्रान खाटीक,रफिक मिस्तरी,मुशीर शेख,शाहरूख सिंगर, भिकन मिस्तरी,गयास अहलेकार,रुकनोद्दीन अहलेकार,रफिक अहलेकार,मुजीब अहलेकार,मसर्र्त अली,सुलतान भाई,जलाल p o p ,एजाज़ भाई,अ.खालीक ,अफजल क़ाजी,सलीम खाटीक,जावेद भाई,विजु शेट,मुकेश जी,कमू मास्टर,हुसैन भाई,युसूफ पठाण,इकबाल बादशाह, बहू संख्याने आदी मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button