Amalner

Amalner: भिलाली येथील साठवण बंधाराची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे – माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ

Amalner: भिलाली येथील साठवण बंधाराची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे – माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ

आज 1मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भिलाली गांवातील साठवण बंधाराचे काम सुरु आहे.तसेच बंधारासाठी 1 कोटी 36 लाखाचा साठवण बंधारा हा फरशी पुलाला लागुन बांधला जात आहे.बंधारा बांधताना त्यांच्या पाया हा जमिनीत खडक अगर कडक मुरुम वर पाया ओतला जायला पाहिजे होता.परंतु ठेकेदाराने सदर पाया हा वरचेवर वाळुवर ओतला जात आहे. कारण सदर पाया वरती म्हणजे वाळुवर ओतला जात असल्याने पावसाळ्यात पुराचा दाबामुळे बंधाराचे पायाचा खालुन पाणी जावुन बंधारा वाहु शकतो तसेच जास्त पाण्याचा दाब असल्याने फरशी सुध्दा वाहु शकते व शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकते.म्हणुन बंधाराचे बांधकामाची चौकशी करून इस्टीमेट प्रमाणे बांधकाम करावे अशी मागणी भिलाली येथील ग्रामस्थांची आहे. सदर ठेकेदार यांना वारमवार सुचना देवुन सुध्दा नियमाप्रमाणे कामकाज करत नव्हता. सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्याने भिलाली येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी संबधीत विभागाकडे तक्रार केली होती. तरी देखील संबधीत अधिकारी चौकशी करायला येत नव्हते.म्हणुन आज भिलाली येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. शिवाजी कन्हैयालाल पाटील ,श्री.विजय शिवाजी पाटिल, श्री.रविंद्र साहेबराव पाटील, श्री. सतिष भगवान पाटिल यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भिलाली गांवातील कामाला न्याय मिळणार यांचे अवचित्ते सांधुन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपोषणाची नोटीस दिली होती.आणी ते आज रोजी 1 मे रोजी सकाळी 8 वाजता उपोषणाला बसलेले होते. गांवातील ग्रामस्थ श्री.विश्वास पाटील, संजय पाटिल, दिपक पाटिल, डाँ. नानाभाऊ पाटील, दिलभर पाटील, चंपालाल पाटिल, अमुत पाटील, निलेश पाटिल, चेतन पाटील, भावेश पाटील, रमाकांत पाटील, रावसाहेब पाटील, रामकुष्ण पाटील, कुणाल पाटील,भोला पाटील आदी ग्रामस्थ यांच्या सोबत मा.आमदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून चौकशी करुन चांगले बांधकाम करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button