Jalgaon

?️ Big Breaking…ठेकेदाराकडून 13 हजाराची लाच घेतांना सिंचन विभागातील लेखाधिकाऱ्याला अटक

ठेकेदाराकडून 13 हजाराची लाच घेतांना सिंचन विभागातील लेखाधिकाऱ्याला अटक

रजनीकांत पाटील

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत सिंचन विभागातील लेखाधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचून सुरेंद्रकुमार आहिरे (रा. जळगाव) या अधिकाऱ्याला 13 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.

जिल्हा परिषदमधील सिंचन विभागात काम करणाऱ्या लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याने ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी १५ हजाराची मागणी केली होती. परंतू ठेकेदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीचे पथक सोमवारी (दि. १५) पासून जिल्हा परिषदच्या आवारात सापळा रचलेला होता. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ठेकेदाकडून तडजोडीअंती 13 हजाराची लाच घेतांना या पथकाने रंगेहात अटक केली. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्हा परिषदच्या आवारात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिक विभागाचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कळासने, पो.नि. चंद्रकांत फालक, पो.ना. श्री. सपकाळे, प्रविण महाजन, पी.एच. पगारे यांनी ही कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button