M/S विसपुते इंन्डेन गॅस एजन्सीत चोरी..!रोख रकमेसह इतर सामानाची चोरी..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
पातोंडा ता.अमळनेर येथे पातोंडा ते चोपड़ा रोडवर विसपुते इंडियन ग्रामीण वितरक पातोंडा या इंडियन गॅस एजन्सीत चोरी झाल्याची घटना घडली आहे. ह्या एजन्सी चे मॅनेजर उल्हास तुकाराम पाटील रा. नांदेड ता.धरणगांव हे असून गस एजन्सीची
देखरेख करतात व त्यांच्या हाताखाली सहा कामगार कामास असुन ते दररोज सकाळी 09.00 वा. गस एजन्सी उघडून सायंकाळी 06.00 वा च्या सुमारास गस एजन्सी बंद करून घरी निघुन जातात. दि. 18/09/2021 रोजी शनिवार असल्याने नेहमीप्रमाणे एजन्सीचे मॅनेजर आणि सहा कामगार सायंकाळी 06.00 वा.च्या सुमारास आमची इंडियन गस एजन्सी बंद करून घरी निघुन गेले.गॅस एजन्सीमधील गणपती विसर्जन करण्यासाठी 19/09/2021 रोजी सकाळी 09.00 एजन्सीत गेले होते. विसर्जन झाल्यावर दुपारी 01.00 वा. एजन्सी बंद करून घरी सर्व जण घरी निघून गेल्यानंतर दि. 20/09/2021 रोजी सकाळी 08.30 वा.च्या सुमारास गॅस एजन्सी चे मॅनेजर उल्हास पाटील यांचा फोन आला की, आपल्या गॅस एजन्सीचे लोखंडी शटरचे तीन पजी पाट्या तुटलेल्या दिसत असुन चोरी झाली आहे. शटरचे कुलूप उघडून आत प्रवेश करून पाहिले असता काउंटरच्या लाकडी ड्रॉवर हे उघडे दिसुन त्यात ठेवलेले सुमासे 80000/- रू रोख दिसले नाहीत तसेच बाजुच्या
केबिनमधील लाकडी कपाटातील इंडियन कंपनीचे 32 रेग्युलेटर दिसले नाही. चोरी झाल्याची खात्री झाल्याने चोरी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम 80,000/- रू रोख भारतीय चलनी नोटा, 16,000/- किमतीचे इंडियन गस कंपनीधे लाल रंगाचे 32 सेयुलेटर
प्रात्यकी किंमत 500/- रु प्रमाणे एकूण 96,000/-येणेप्रमाणे वरील वर्णानाचे व किंमतीचे रेग्युलेटर व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी
दि. 19/09/2021 चे दु.01.00 ते दि. 20/09/2021 रोजी सकाळी 08.30 वा.च्या दरम्यान लबाडीव्या इराद्याने स्वताच्या फायदयासाठी चोरून नेली आहे. भारतीय दंड संहिता 1860 461 व 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.पोनी सो यांचे आदेशाने पोहेक/1605 सुनिल पाटील हे करीत आहेत.






