Amalner

Amalner: भयानक अपघातात  चोपड्याचे तिघे ठार..कालिपिली टॅक्सी आणि दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्या..

Amalner: भयानक अपघातात चोपड्याचे तिघे ठार..कालिपिली टॅक्सी आणि दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्या..

अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमीनी गाडीचा अपघात होऊन चोपड्याचे तीन जण जागीच मयत तर चार जण जखमी झाल्याची घटना दि 7 रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी , लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व शिवाजी नगर मधील एक असे तिघे मयत झाले आहेत. चार जण जखमी आहेत. टॅक्सी तील प्रवासी ज्ञानेश्वर सोनार रा सुरत याला डॉ सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खाजगी दवाखान्यात गेले आहेत.

चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्स चे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलसीट मोटरसायकल क्रमांक MH 19 DL 8693 वर ट्रीपलसीट चोपडयाकडे निघाले होते. चोपड्या कडून टॅक्सी क्रमांक MH 19 Y 1828 येत होती. टॅक्सी मध्ये १२ जण होते. समोरून दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या. अचानक दोन्ही मोटारसायकल टॅक्सीवर धडकल्या.यामुळे चालकाचे पाय स्टेअरिंग मध्ये अडकले. तर दोन्ही मोटारसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या. त्यात दोघे जण जागीच ठार झाले.एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. विजय महाजन धुळे येथे उपचार घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button