माध्यमिक विद्यालय अवनखेडच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
कर्मवीर रा.स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे माध्यमिक विद्यालय अवनखेड येथील विद्यार्थ्यांच्या उपकरणाची इन्स्पायर अवॉर्ड साठी विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार विद्यालयातील इयत्ता सातवी तील विद्यार्थी परशराम रमेश पिंगळे याने युरिया स्पेडर मशीन हे उपकरण तयार केले होते. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या यंत्राची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. त्याला विज्ञान शिक्षक श्री आर. एस. घडवजे व थोरात सर यांचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या यशाबद्दल कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री रामजी शेटे व उपाध्यक्ष उत्तम बाब भालेराव ,संस्थेचे सचिव श्री बाळासाहेब उगले व सर्व संचालक मंडळ शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री रामदास पिंगळ अवनखेड चे सरपंच नरेंद्र जाधव व सर्व सदस्य ग्रामस्थ पालक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही.के. शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले






