Maharashtra

राजमाता प्राथमिक विद्यालय ,पाटणा रोड चाळीसगाव येथे डिजिटल बोर्ड भेट युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांचा विद्यार्थी हिताचा उपक्रम

राजमाता प्राथमिक विद्यालय ,पाटणा रोड चाळीसगाव येथे डिजिटल बोर्ड भेट
युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांचा विद्यार्थी हिताचा उपक्रम

राजमाता प्राथमिक विद्यालय ,पाटणा रोड चाळीसगाव येथे डिजिटल बोर्ड भेट युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांचा विद्यार्थी हिताचा उपक्रम

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
राजमाता प्राथमिक विद्यालय, पाटणा रोड, चाळीसगाव येथे गणवेश वाटपाचा कार्यक्रम युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते गणवेश वाटप होऊन त्यांच्यामार्फत या शाळेला विद्यार्थ्यांच्या क्षमता अधिकाधिक वृद्धिंगत होत जाव्या यासाठी डिजिटल बोर्ड देण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “भारत जर महासत्ता व्हावा असे वाटत असेल तर विद्यार्थी शिकले पाहिजे, विद्यार्थी हेच खरे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यापर्यंत अधिकाधिक शिक्षण डिजिटल पद्धतीने पोहोचावे यासाठी हा डिजिटल बोर्ड देण्यात येत आहे.”
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश भाऊ सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की, “2008 साली  ही शाळा दोन खोल्यांमध्ये सुरू केली. सर्व खर्च स्वतः संस्थेच्या माध्यमातून केला.आजपर्यंत कुठलीही व कोणाकडूनही मदत घेतलेली नाही. पण युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांच्यासारख्या उमद्या दातृत्ववाण माणसाकडे व त्यांची सामाजिक जाणीव पाहून डिजिटल बोर्डाची मागणी केली व ती लागलीच त्यांनी पूर्ण केली. संस्थेच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.”
त्यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी शिक्षणाधिकारी आण्णासो.एस.डी.पाटील साहेब, युवानेते मंगेश चव्हाण, माजी प.स.सदस्य सतिष पाटे, शाळेचे सचिव जगदीश सूर्यवंशी सर, कोदगाव गावाचे सरपंच हेमंत पाटील, रोहिणी गावाचे सरपंच अनिल नागरे,  पी.एम. पाटील सर, माजी नगरसेवक निलेश राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, धैर्यशील पाटील, प्रशांत पाटील, वराडे सर, मनोज गोसावी, राज पाटील, तुषार चव्हाण, विशाल पाटील, जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील पाटील तर सूत्रसंचालन राहुल आमले सर यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button