युवा रंग फाउंडेशन तर्फे पोलीस बांधवाना चहा,नाश्ता व्यवस्था
फहिम शेख
नंदुरबार
युवा रंग फाउंडेशन तर्फे संचारबंदीतील बंदोबस्तात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चहा नाश्ता व पाण्याची सौय करण्यात आली. आज दिनांक 24 मार्च मंगलवार रोजी कॉरोना वायरस चा प्रसार कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार तर्फे संचार बंदीची आदेश देण्यात आले असून मध्य रात्री पासून त्याची कडक अंमलबजावणी पोलीस विभाग तर्फे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या सेवेत असलेले कर्मचाऱ्यांना युवा रंग फाऊंडेशन तर्फे चहा नाश्ता व पाणी पुर्वीण्यच काम करण्यात आला य वेडेत फाउंडेशन ची सर्व पद अधिकारी व कार्यकर्ता उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना सदर वस्तू वाटप करत होते.






