तळेगाव दिंडोरी येथे तरूण युवकाचा दगडाने ठेचुन खुन
सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील दिपक जनार्दन जाधव वय २२ यांचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचुन खुण करूण पसार झाले .राञीच्या थंडीचा फायदा घेत सदर व्यक्तीचे प्रेत सार्वजनिक वाचनालयाजवळील बाभळीच्या झाडाजवळील झुडपांमध्ये प्रेत टाकुन अज्ञात व्यक्तीने पळ काढला .याबाबत गावचे पोलिस पाटील रोशन परदेशी यांनी भ्रमणध्वणीवरूण दिंडोरी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली खुनाच्या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ सो व पी एस आय लोखंडे सो पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व खुनाचा पुढील तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार करित आहे पोलीस गुन्हेगाराच्या शोध करीत अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते याबाबत सविस्तर तपास संबंधित यंत्रणा करीत आहे






