Maharashtra

येवला काॅगेसचे तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन

येवला काॅगेसचे तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये अन्यायकारक पद्धतीने केलेल्या दरवाढीच्या विरोधात येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर कमी करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली.
जग सध्या करोणाच्या संसर्ग रोगाच्या महामारिन त्रस्त आहे. या संसर्ग रोगाच्या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहे. उद्योगधंदे बंद पडले आहे, बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे जनता जीवन जगण्याची धडपड करीत आहे अशा कठीण परिस्थितीत परिस्थितीत पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली आहे.
०७ जून २०२० पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे सदर दर वाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर ९.१२ रुपये तर डिझेलमध्ये हे प्रतिलिटर ११.०१ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमती प्रति लीटर ८७ -८८ रुपयाच्या पुढे गेल्या आहेत तर डिझेल पेट्रोल पेक्षाही महाग झाले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य शक्य असताना केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे किंमतीमध्ये दरवाढ केली आहे. सदरची दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार रोहिदास वारुळे यांना करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी झाली पाहिजे मोदी सरकार हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अनिल पहिलवान, तालुकाध्यक्ष अँड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रितम पटणी, उस्मान शेख, बळीराम शिंदे तालुका कार्याध्यक्ष संदीप मोरे, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, अमित पटणी, भगवान चित्ते, दत्तात्रय चव्हाण, माधव सोळसे,कैलास घोडेराव आबासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, जयप्रकाश वाघ, दत्तू भोरकडे, कार्तिक बनकर सतीश सूर्यवंशी, संजय कुराडे, धोंडीराम पडवळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button