Yawal: चितोडा-सांगवी बु-हंबर्डी-हिंगोणा येथे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद
यावल .(प्रतिनिधी)- रावेर-यावल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सर्वत्र वेग आला असून रावेर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी यावल तालुक्यातील चितोडा,सांगवी बु,हंबर्डी,हिंगोणा गावात प्रचार करत मतदारांशी संवाद साधला असून यावेळी प्रचार रॅलीत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्याने यावल तालुक्यातील मौजे चितोडा-सांगवी बु-हंबर्डी-हिंगोणा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला
मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी,हाताला काम, महिलांना सुरक्षित वातावरण,शेतीला पाणी, शेतमालाला योग्य दाम मिळवुन देण्यासाठी हि निवडणूक लढवत असुन ‘हाताचा पंजा’ या चिन्हां समोरील बटण दाबुन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून चितोडा सांगवी बु.,हंबर्डी,हिंगोणा येथे विविध विकास कामे करण्यात आलेली त्यात गावांअंतर्गत काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना सांगवी बु,आसराबारी रोडवर दोन पूलबांधकाम करणे पाण्याची पातळी टिकून राहावी यासाठी साठवण बंधारे अशी मूलभूत सुविधा ची कामे झाली असुन भविष्यात आपण टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत या गावांचा व मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्रामस्थांना ग्वाही दिली…
महाविकास आघाडीचे पदाधिकारी,उपस्थित होते…






