यावल येथे रेशनिंगचा काळाबाजाराच्या चौकशीची मागणी
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
हिंगोणा ता यावल प्रतिनिधी यावल शहरात स्वस्त धान्य दुकान नं १२४ दुकान दाराचे नाव जोसाबाई सुपडु गजरे यांच्या दुकानात काळाबाजार करण्यात आल्याची चर्चा शहरात होत आहे. तसेच अनेक लाभार्थींनी शासनाने दिलेला मोफ़त धान्य वाटप व्यवस्थित देत नाही तसेच शासनाने दिलेल्या धान्याची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली.
यावल शहरात प्रत्येक लाभार्थींना चना दाळ व तुर डाळ १ किलो वाटप केले आणि शासनाकडून दोन किलो दाळ वाटप करण्याचे आदेश होते मात्र संबधित दुकानदाराने लाभार्थींना एक किलो चना डाळ देऊन बाकी उरलेल्या डाळीत गडबड केल्याचे समोर आले आहे.
दुकानदारास बोलायला गेल्यास लाभार्थींच्या अंगावर मारायला धावून जायचा. या भीतीने लाभार्थी प्रशासनाकडे तक्रार करण्यास टाळाटाळ करत होते. दुकानदार लाभार्थ्यांना धमकी देत म्हणायचा…सर्व अधिकारी माझ्या खिशात घेऊन फिरतो कोणीही माझ काहीही करू शकत नाही अशी दमदाटी विरुध्द बोलणाऱ्यांना देत होता. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष अँड संदीप भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.
या कोरोनाच्या महाभयंकर संकटात गरीब लोकांना तो धान्य वाटप करत नाही याची दखल वरीष्ठ नेत्यांनी घेवुन लवकरात लवकर त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मी आग्रहाची नम्र विनंती करतो, लवकरात लवकर त्याची चौकशी करण्यात यावी. त्याच्या दुकान सील करण्यात यावे. संदीप भैय्यासाहेब पाटील, रेशनिंग कमीटी अध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, जि.प. गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी लवकरात लवकर त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
या दरम्यान, जिल्हा अध्यक्ष अँड संदीप भैय्यासाहेब पाटील, रेशनिंग कमिटी अध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, जि प गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका रेशनिंग कमीटी तयार करण्यात आल्या. कोरोनाच्या महाभयंकर संकटात जिल्हा रेशनिंग कमिटी सदस्य चंद्रकलाताई इंगळे व तालुका रेशनिंग कमिटी सदस्य कदीर भाई, अनील जंजाळे हाजी गफ्फार शेट हे सुद्धा यावल रेशनिंग दुकानात जाऊन स्वत पाहणी करत आहे.






