World Cup T -20: 2024: आणि शेवटच्या 45 मिनिटात टीम इंडियाने खेळ पलटवला…कसा..?
सध्या विश्वचषक T 20 चे क्रिकेट चे सामने सुरू असून काल भारत विरूध्द पाकिस्तान ह्या दोन टीम एकमेकांसमोर होत्या.भारत विरूध्द पाकिस्तान हा क्रिकेट चा सामना नेहमीच रोमांचक आणि रंजक असतो.दोन्ही देशांचे क्रिकेट चे चाहते देखील मोठ्या संख्येने आहेत. काल न्यूयॉर्क येथे अत्यंत चुरशीचा हा सामना पार पडला.ह्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला.हा विजय खूप खास आहे. कारण भारतापेक्षा पाकिस्तानकडे विजयाची संधी अधिक होती. 97.52% टक्के त्यांना जिंकण्याचा चान्स होता. टीम इंडियाने सर्व प्रतिकुल परिस्थितीवर अडचणींवर मात करुन हा विजय मिळवला. शेवटच्या 45 मिनिटात बाजी कशी पलटली.. पाकिस्तानच्या जिंकण्याची संधी जास्त होती भारताकडे कमी..
T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत काल भारत-पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना झाला. शेवटच्या 45 मिनिटात टीम इंडियाने फक्त सामनाच जिंकला नाही, तर क्रिकेट चाहत्यांनी या खेळाचा सर्वोत्तम थरार अनुभवला. आणि चाहत्यांची मने ही जिंकली. अगदी हाततोंडाशी आलेला विजय टीम इंडियाने पाकिस्तानकडून हिरावला. पाकिस्तानच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताला काल फार मोठी धाव संख्या गाठता आली नाही. टीम इंडियाने फक्त 120 धावा केल्या. T20 मध्ये इतक्या कमी धावांच टार्गेट सहज पार करता येणार होत. एकवेळ अशी होती ही धाव संख्या पाकिस्तान सहज पार करेल असं वाटतं होत.चित्र होत. त्यामुळे टीम इंडियाने एकदम विपरित, प्रतिकुल परिस्थितीतून हा विजय मिळवला. टीम इंडियाने अशक्य वाटणारी गोष्टी शक्य करुन दाखवली. याच सगळ श्रेय जातं, गोलंदाजांना खासकरुन जसप्रीत बुमराहला… बुमराह ने पाकिस्तानी फलंदाजांना गुमराह करून शेवटच्या 45 मिनिटात संपूर्ण गेमच बदलवून टाकला.भारतीय क्रिकेट संघाने मिळविलेला हा विजय खास आहे. दुसऱ्या इनिंगच्या 11 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानी टीम विजयाच्या मार्गावर होती. पण त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण खेळच पालटला. 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी टीमने चांगली, सावध सुरुवाती केली होती. 11 ओव्हरमध्ये त्यांच्या 2 बाद 66 धावा होत्या. 54 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 54 धावांची गरज होती. त्यांच्या विजयाची मोठी संधी होती.
शेवटची 45 मिनिटे…
12 ओव्हरनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीच कंबरड मोडलं. फलंदाजी अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांकडून विशेष कामगिरी अपेक्षित होती ती गोलंदाजांनी पूर्ण केली.टीम इंडियाने सामना आपल्या बाजूने झुकवायला फक्त 45 मिनिट घेतली. पटापट फखर झमन, शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांनी पॅव्हेलियनची वाट धरली. अखेरीस टीम इंडियाने 6 धावांनी थरारक विजय मिळवला.






